MB NEWS:भरदुपारी महिला नायब तहसीलदारांना जाळून मारण्याचा प्रयत्न !

  भरदुपारी महिला नायब तहसीलदारांना जाळून मारण्याचा प्रयत्न !

केज :- केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांच्या अंगावर अज्ञात व्यक्तींनी अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.


या बाबत विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवार दि. २० जानेवारी रोजी दुपारी  २:३० केज तहसीलच्या संजय गांधी विभागाच्या नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड या बीड रोड वरील बीएसएनएल टॉवरच्या पाठी मागील भागातील त्यांच्या घरी दुपारचे जेवण करून तहसील कार्यालयाकडे येत आसताना त्यांना एका चार चाकी गाडीतून आलेल्या त्यांच्या भावाची बायको सुरेखा मधुकर वाघ, तिचा भाऊ हरिदार भास्कर महाले आणि तिची आई मुंजाबाई भास्कर महाले आणि एक अनोखी महिला व वाहन चालक यांनी त्यांना रस्त्यात अडवून जळगाव जिल्ह्यातील दोनडिगर येथील जमिनीच्याव हक्क सोड पत्रावर सही करण्यासाठी जबरदस्ती केली तसेच तुझ्यामुळे मधुकर वाघ हा जेल मध्ये असल्याने त्याची सुटका करण्यासाठी पोलीस केस मागे घे असे म्हणून त्यांच्यात बाचाबाची झाली आणि त्या महिलांनी त्यांच्या गळ्यात दोरीचा फास टाकून गळा आवळला. हरिदास मुंजाबा महाले याने अंगावर पेट्रोल सदृश्य ज्वलनशील पदार्थ टाकला आणि त्यांना पेटवून देण्यासाठी माचीस किंवा लायटर काढीत असताना नायब तहसीलदार आशा वाघ- गायकवाड यांनी आरडा ओरड करून बीड रोडवरील हॉटेल मधूबन च्या दिशेने पळाल्या. 


लोक जमा होताच  हल्लेखोर त्यांनी आणलेल्या चार चाकी गाडीतून पळून गेले. आशा वाघ-गायकवाड यांच्या गळ्यावर स्पष्ट दिसत आहेत. 


दरम्यान नायब तहसीलदार आशा वाघ गायकवाड यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस घटनेची सविस्तर माहिती घेत आहेत. 


 यापूर्वीही झाला होता आशा वाघ -गायकवाड यांच्यावर त्यांच्या सख्ख्या भावाने केला होता जीवघेणा खुनी हल्ला 


 या पूर्वी दि. ६ जून २०२२ केज तहसील कार्यालयात त्यांचा सख्खा भाऊ मधुकर वाघ याने धारदार कोयत्याने खुनी हल्ला केला होता त्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्या प्रकरणी मधुकर वाघ आणि अन्य एकावर केज पोलीस ठाण्यात  दि. ७ जून रोजी गु. र. नं. २२२/२०२२ नुसार भा. दं. वि. ३५३, ३०७, ३३३ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या प्रकरणी मधुकर वाघ हा कारावासात असून त्याची अंडर ट्रायल सुनावणी सुरू आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार