MB NEWS:रमाई आवास योजनेचे पहिला हप्ता उचललेल्या लाभार्थ्यांनी घरकुलांचे बांधकाम तात्काळ सुरु करावे- नगर परिषदचे मुख्याधिकारी एस.ए.बोंदर

 रमाई आवास योजनेचे पहिला हप्ता उचललेल्या लाभार्थ्यांनी घरकुलांचे बांधकाम तात्काळ सुरु करावे- नगर परिषदचे मुख्याधिकारी एस.ए.बोंदर




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-

 रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुर झालेल्या पहिला हप्ता उचलुन घरकुलाचे पहिल्या टपायातील बांधकाम सुरु केलेले नाही अशा लाभार्थ्यांनी पंधरा दिवसात मंजुर घरकुलाचे पहिल्या टपायातील बांधकाम सुरु करावे अन्यथा घरकुलाची मंजुरी रद्द करुन उचललेल्या पहिल्या टप्याची रक्कम कायदेशीर परत घेतली जाईल अशा नोटीसा परळी नगरपालिकेने संबंधीत लाभार्थ्यांना काढल्या आहेत. रमाई आवास योजनेतील पहिला हप्ता उचलुनही बांधकाम न करणार्या लाभार्थ्यांनी घरकुलांचे बांधकाम तात्काळ सुरु करावे असे आवाहन परळी नगर परिषदचे मुख्यधिकारी एस.ए.बोंदर यांनी केले आहे. 

दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, परळी वैजनाथ नगर परिषद क्षेत्रातील रमाई आवास योजने मध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील व्यक्तींना घरकुल योजना २०१७ -२०२१ पर्यत एकूण ६४० घरकुल मंजुर झाले आहेत. पहिला टप्पा १२४, दुसरा टप्पा ९३, तिसरा टप्पा २०७ व चौथ्या टप्पा २१६ असे एकूण ६४० घरकुल मंजूर झाले आहेत. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कडून एकूण निधी १४७९.९९ इतका प्राप्त झाला असून मंजुर घरकुल ६४० पैकी ५५९ लाभार्थीना घरकुल बांधकाम परवानगी देण्यात आली आहे. ५५९ लाभार्थीना धनादेश वाटप करण्यात आले आहेत. ५५९ लाभार्थी पैकी अद्याप काम सूर न करणारे ९५, लाभार्थी आहेत. पूर्ण बांधकाम केलेले लाभार्थी २३५ आहेत. प्रगती पथावर २३१ लाभार्थी आहेत. अद्याप नगर परिषद मध्ये कागदपत्रे पूर्तता न करणारे लाभार्थी ७९ आहेत. 

उर्वरित ९५ लाभार्थीनी १५ दिवसाच्या आत बेसमेंट लेव्हलचे बांधकाम पूर्ण न केल्यास आपले सदरील योजने अंतर्गत घरकूल बांधकाम प्रस्ताव रद्द करून वितरीत करण्यात आलेला निधी कायदेशीर कार्यवाही करून वसूल करण्यात येईल. तरी उर्वरित  लाभार्थीनी १५ दिवसाच्या आत बांधकाम पूर्ण करून घ्यावे असे आवाहन नगर परिषदचे मुख्यधिकारी एस.ए.बोंदर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !