MB NEWS:राजमाता जिजाऊ यांची जयंती पवनराजे अर्बन निधीत उत्साहात साजरी

 राजमाता जिजाऊंचे संस्कारच हिंदवी स्वराज्याचा पाया होता-प्रल्हाद सावंत

राजमाता जिजाऊ यांची जयंती पवनराजे अर्बन निधीत उत्साहात साजरी


परळी वैजनाथ/ प्रतिनिधी


राजमाता जिजाऊ यांची जयंती आज गुरुवार दिनांक 12 जानेवारी रोजी पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळील पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधीत राजमाता जिजाऊ यांची जयंती आज 12 जानेवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस अध्यक्ष श्री प्रल्हाद सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 


याप्रसंगी बोलताना श्री प्रल्हाद सावंत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. रयतेला भरडणाऱ्या आणि रयतेवर अनन्वित अन्याय करणाऱ्या जुलमी राजवटींविरोधात छत्रपती शिवरायांनी शड्डू ठोकला. सोबत होते फक्त मुठभर मावळे...स्वराज्यावर आलेली अनेक संकट या मावळ्यांनी अंगावर झेलली. प्रसंगी बलिदान दिलं पण स्वराज्याची ज्योत नेहमीच तेवत ठेवली. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य घडवलं खरं, पण त्यामागं मोठा वाटा होता तो राजमाता जिजाऊंचा...जर जिजामाता नसत्या तर कदाचित हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकलं नसतं. राजमाता जिजाऊंचे संस्कार हे हिंदवी स्वराज्याचा पाया होते. त्याच जीवावर छत्रपती शिवरायांनी बलाढ्य अशा जुलमी राजवटांशत्रूचा सामना करण्याचं अशक्यप्राय कार्य सिद्धीस नेलं असे सांगितले.

त्यावेळी कार्यक्रमास पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधी चे सचिव श्री गोविंद दिलीपराव भरबडे यांच्यासह सर्व संचालक ,सभासद ,कर्मचारी, नागरिक व पिग्मी एजंट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार