युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:तिघांच्या हत्या प्रकरणात दोघांना जन्मठेप

 तिघांच्या हत्या प्रकरणात दोघांना जन्मठेप


बीड न्यायालयाचा निकाल


बीड, : गेवराई येथील सरस्वती कॉलनीत भवानी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य शाखेतील प्रमुख वसुली अधिकारी तथा वरिष्ठ व्यवस्थापक आदिनाथ उत्तमराव घाडगे यांच्या घरी सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत घाडगे दाम्पत्याची हत्या करून दोन मुलींवर हल्ला केला होता. उपचारादरम्यान बाळंतीण मुलीचाही मृत्यू झाला होता. दरम्यान, पाच वर्षांपूर्वीच्या या घटनेत दोन आरोपींना येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्या. हेमंत महाजन यांनी १७ जानेवारी रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.


गेवराई शहरातील गणेशनगरातील सरस्वती कॉलनीत बँक अधिकारी आदिनाथ उत्तमराव घाडगे (वय ५०) रहात. दि.२४ ऑगस्ट २०१७ रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी कटावणीने कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला.दरोडेखोरांनी आदिनाथ व अलका घाडगे (४२) यांच्यावर धारदार शस्ञांनी  हल्ला चढवला. यानंतर बाळंतपणासाठी आलेली मुलगी वर्षा संदीप जाधव (२२) व स्वाती घाडगे (१८) या दोन्ही मुलींवरही धारदार शस्ञाने हल्ला करून ऐवज लुटला होता. यात जखमी वर्षाचा उपचारादरम्यान वर्षभरानंतर मृत्यू झाला होता. गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, उपअधीक्षक डॉ. अर्जुन भोसले यांनी वेगाने तपासचक्रे फिरवली.  त्यानंतर सोमा शेरू भोसले (रा. केकतपांगरी ता.गेवराई, हमु. अचानकनगर, गेवराई) व लखन प्रताप भोसले (रा.कौडगाव घोडा ता.परळी) यांना अटक केली होती. आरोपींकडून घाडगे यांच्या घरातून चोरून नेलेला मोबाइल हस्तगत केला होता. तपास करून उपाधीक्षक डॉ. अर्जुन भोसले यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. दरम्यान प्रमुख जिल्हा सत्र न्या. हेमंत महाजन यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. जिल्हा सरकारी वकील अजय राख यांनी सरकार पक्षाकडून बाजू मांडली. त्यांनी २२ साक्षीदार तपासले. अजय राख यांचा युक्तिवाद, साक्षीपुरावे ग्राह्य धरून न्या. हेमंत महाजन यांनी दोन्ही आरोपींना १६ जानेवारीला दोषी ठरवले. १७ जानेवारीला जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या