MB NEWS:प्रा पवन मुंडे बहुप्रतिष्ठित "गौरव भुमिपुत्राचा पुरस्काराने" सन्मानित

प्रा पवन मुंडे  बहुप्रतिष्ठित  "गौरव भुमिपुत्राचा पुरस्काराने" सन्मानित




परळी वैजनाथ दि.१९ (प्रतिनिधी)

            येथील भाजपचे युवा नेते तथा नगरसेवक प्रा पवन मुंडे यांना सकाळ माध्यमाच्या बहुप्रतिष्ठित "गौरव भुमिपुत्रांचा" या पुरस्काराने औरंगाबाद येथे सन्मानित करण्यात आले. या वेळी झालेल्या ऐका कार्यक्रमात जेष्ठ विधिज्ञ अँड उज्वल निकम व सकाळचे संपादक दयानंद माने यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

              सकाळ माध्यम समूहाच्या वतीने मराठवाड्यातील सामाजिक व इतर कार्यात उत्तुंग भरारी घेणाऱ्या, अग्रेसर असलेल्या भुमिपुत्रांचा सन आँफ द साँईल-आयडाँल आँफ महाराष्ट्र पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये येथील भाजपचे संघर्षशील युवा नगरसेवक प्रा. पवन मुंडे यांच्या सामाजिक तसेच इतर कार्याची दखल घेत सकाळ समूहाच्या वतीने सन आँफ द साँईल-आयडाँल आँफ महाराष्ट्र गौरव भूमिपुत्रांचा या पुरस्काराने औरंगाबाद येथे हाँटेल सयाजी मध्ये झालेल्या भव्य कार्यक्रमात अँड उज्वल निकम व सकाळचे संपादक दयानंद माने यांच्या हस्ते सपत्नीक गौरविण्यात आले. यावेळी अँड उज्ज्वल निकम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सकाळ माध्यम समूहाचा सत्कार स्विकारल्यानंतर आता इतरांनी पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करण्याची जबाबदारी आहे.कितीही मोठे व्हा, माणुसकी विसरू नका, असा मोलाचा सल्ला अँड निकम यांनी दिला. यावेळी मराठवाड्यातील अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या विविध क्षेत्रातील भुमिपुत्रांचा सत्कार करण्यात आला.


दैनिक सकाळ ने माझ्या सारख्या लहान कार्यकर्त्यांचा केलेला सन्मान हा माझ्या साठी समाजात काम करण्यासाठी ऊर्जा देणारा स्रोत असून, इथून पुढे माझ्या वाढलेल्या जीमेदारीचा स्वीकार करून उर्वरित आयुष्य समाजातील कचलेल्या,पिचलेल्या,दबलेल्या लोकांसाठी खर्ची करण्याचा निर्धार या वेळी आपल्या मनोगतात प्रा पवन मुंडे यांनी व्यक्त केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार