MB NEWS:शिक्षकांना न्याय देण्यासाठी भाजप कटिबद्ध- चंद्रशेखर बावनकुळे

 बीड जिल्हयातील शिक्षकांचे मतदान किरण पाटील यांच्याच पारडयात - पंकजाताई मुंडे यांचा शब्द 


शिक्षकांना न्याय देण्यासाठी भाजप कटिबद्ध- चंद्रशेखर बावनकुळे



किरण पाटील मतदारांचा विश्वास नक्की सार्थ ठरवतील- खा. डाॅ. प्रितमताई मुंडे


_भाजप महायुतीचे उमेदवार प्रा. किरण पाटील यांच्या प्रचारार्थ गेवराई, बीड, अंबाजोगाईतील शिक्षक मेळाव्यास मोठा प्रतिसाद_ 


बीड ।दिनांक २०।

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार प्रा. किरण पाटील हे सोज्वळ, कार्यक्षम आणि कोरी पाटी असलेले उमेदवार आहेत. आमदार नसतांना देखील त्यांनी शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे त्यांचा विजय  निश्चित आहे. जिल्हयातील शिक्षकांचे मतदानही त्यांच्याच पारडयात पडेल असा विश्वास व्यक्त करत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी पाटील यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं असं आवाहन आज ठिक ठिकाणी मेळाव्यात बोलताना केलं.


   केंद्रात व राज्यात भाजपचं सरकार असल्यानं शिक्षकांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं तर किरण पाटील हे निवडून आल्यास शिक्षकांचा विश्वास सार्थ ठरवतील त्यामुळे त्यांना विजयी करा असे आवाहन खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केले. 


मराठवाडा विभाग शिक्षक मतदारसंघाचे भाजप व मित्र पक्षांचे उमेदवार प्रा. किरण पाटील यांच्या प्रचारार्थ आज गेवराई , बीड व अंबाजोगाई येथे आयोजित शिक्षक मेळावा पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडे, आ. सुरेश धस, आ. लक्ष्मण पवार, भीमराव धोंडे, आर टी देशमुख, केशवराव आंधळे, आदिनाथ नवले, रमेश आडसकर,  उमेदवार प्रा. किरण पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, बस्वराज मंगरूळे, संजय केणेकर, अक्षय मुंदडा आदी याप्रसंगी उपस्थित होते.


शिक्षक हे ज्ञानदानाचं पवित्र कार्य करतात, भावी पिढी घडवतात.  त्यामुळे त्यांना संस्थाचालक आणि सरकारकडून संरक्षण मिळायला हवं. राज्यातील शिक्षकांची मानसिक स्थिती आज खूप खराब आहे, ते खूप तणावात आहेत, त्यांना न्याय देण्याची खरी गरज आहे. मी ग्रामविकास मंत्री असताना त्यांच्या बदल्यांचा प्रश्न ऑनलाईन पध्दतीने सोडवून अनेकांची या त्रासातून सुटका केली होती. लोकांसाठी समर्पित भावनेनं काम करणं, त्यांचा वाली आणि वाणी बनणं हे मुंडे साहेबांचे आमच्यावर संस्कार आहेत.  राज्यात शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारं आपलं सरकार सत्तेवर आलं आहे, प्रा. किरण पाटील यांच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न नक्की सोडवले जातील, त्यामुळे त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावं असं आवाहन पंकजाताई मुंडेंनी यावेळी केलं.


*चंद्रशेखर बावनकुळे*

---------------

किरण पाटील या धडपडीच्या आणि तळमळीच्या कार्यकर्त्यांला आम्ही या निवडणुकीत उभे केले आहे. शिक्षकांच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. जे अठरा अठरा वर्षे या पदावर निवडून आले त्यांनी शिक्षकांसाठी काहीच केलं नाही पण किरण पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारकडून अकराशे कोटीचं अनुदान पदरात पाडून घेतलं. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याची खरी धमक त्यांच्यातच असल्याने पाटील यांना विजयी करा असं आवाहन केलं.


खा. डाॅ. प्रितमताई मुंडे

----------

किरण पाटील यांनी गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांचे आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरवात केली त्यामुळे त्यांना नक्की यश मिळेल. ज्यांच्या मतांवर आपण निवडून येतो त्या मतदारांच्या निवडून आल्यावर आपल्याकडून खूप अपेक्षा असतात, जो त्यांचे प्रश्न सोडवेल त्याच्या मागे मतदार असतो. बीडचा मतदार खूप प्रेम करतो त्यामुळे इथल्या मतदाराचा विश्वास किरण पाटील सार्थ ठरवतील. एक चांगला उमेदवार म्हणून त्यांच्या पाठिशी उभे रहा असं आवाहन खा. प्रितमताई मुंडे यांनी यावेळी केलं.


   याप्रसंगी किरण पाटील यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं. मेळाव्यास ठिक ठिकाणी शिक्षक मतदार मोठया संख्येनं उपस्थित होता.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !