MB NEWS:प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी नेते फुलचंद कराड यांच्या उपस्थितीत ठरली पुढील रणनीती ;

 प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी नेते फुलचंद कराड यांच्या उपस्थितीत ठरली पुढील रणनीती 


प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - फुलचंद कराड 


परळी वैजनाथ दि १३ :- परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या निर्मितीसाठी जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या नोकरी संदर्भात नुकतीच मुंबईत झालेली बैठक अत्यंत सकारात्मक झाली. बैठकीनंतर प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी नुकतीच एक बैठक होऊन तीत पुढील रणनीती ठरवण्यात आली. प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही अशी स्पष्ट भूमिका प्रकल्पग्रस्तांचे नेते तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी व्यक्त केली. 

प्रकल्पग्रस्तांची मुंबई येथे १० जानेवारी २०२३ रोजी बैठक झाली होती.  सकारात्मक व सफल संपन्न झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज दिनांक १३/०१/२०२३ रोजी प्रकल्पग्रस्तांचे नेते तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांच्या परळी येथील संपर्क कार्यालयात कराड यांच्या उपस्थितीत प्रकल्पग्रस्तांची एक आढावा बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत प्रकल्पग्रस्तांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी विस्तृत रूपात चर्चा होऊन आगामी काळात आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी एक मसुदा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात येऊन त्यासाठी एक समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला व समिती घोषित करण्यात आली. ह्या समितीमध्ये प्रवीण मुंडे, सुधीर फड, राजेभाऊ फड, मुंजा भांगे, वाल्मीक चाटे, भगतसिंग ठाकूर, विलास मुंडे, सचिन नागरगोजे, गोविंद मुंडे व दीपक गडदे आदींचा समावेश सर्वांच्या मताने करण्यात आला. घोषित करण्यात आलेल्या समितीने प्रकल्पग्रस्तांच्या आगामी लढ्यासाठी एक मसुदा तयार करून तो प्रकल्पग्रस्तांचे नेते फुलचंद कराड यांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात येऊन त्यास अंतिम निर्णय एकमताने घेण्याचे ठरले. वीज निर्मितीचे अधिकारी प्रकल्पग्रस्तांना न्याय दिनाच्या उद्देशाने सकारात्मक निर्णय घेतीलच मात्र कोणत्याही परिस्थितीत आपण प्रकल्पग्रस्तांना योग्य तो न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही वाटल्यास आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटून आपण युद्ध पातळीवर प्रयत्न करू अशीही प्रतिक्रिया प्रकल्पग्रस्तांचे नेते तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी बैठकीत व्यक्त केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार