MB NEWS:प्रभाकर साळेगावकर यांची प्रमुख उपस्थिती

 सोमवार दि.१६ जानेवारीला स्व.श्यामराव देशमुख स्मृतिसमारोहाचे मा. नंदकुमार ठाकूर यांच्या शुभहस्ते उद्‌घाटन




 प्रभाकर साळेगावकर यांची प्रमुख उपस्थिती


परळी, दि. 12/01/2023 (प्रतिनिधी)

   येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात दिनांक 16 जानेवारी 2023 ते 19 जानेवारी 2023 दरम्यान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.श्यामरावजी देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मृतिसमारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारोहाचे उद्‌घाटन बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. नंदकुमार ठाकूर यांच्या शुभहस्ते सोमवार दि.16 / 01 / 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता संपन्न होणार आहे.यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी मा. प्रभाकर साळेगावकर यांची प्रमुख उपस्थिती राहील. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष , मा.संजयजी देशमुख हे असतील.

       सुप्रसिद्ध व्याख्याते मा.अविनाश भारती (औरंगाबाद )यांच्या 'आई - बाप दैवत माझे' या विषयावरील व्याख्यानाने स्मृतिसमारोहातील यावर्षीचे पहिले पुष्प गुंफले जाणार आहे. अगदी आई - वडिलांनी मुलांसोबत ऐकावे असे हे दर्जेदार व्याख्यान आहे. याशिवाय 17 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता सुप्रसिद्ध व्याख्याते मा.गणेश शिंदे(पुणे)यांचे 'जीवन सुंदर आहे ' या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. जीवनातील सकारात्मकता वाढविण्यासाठी उपयोगी असे हे व्याख्यान आहे.तर दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्रातील नामवंत अशा  निमंत्रित कवींचे  कविसंमेलन संपन्न होईल. त्यात ग्रामीण जीवन जाणीवेसह वैविध्यपूर्ण  काव्यलेखन करणारे प्रा.डॉ.ललित अधाने (औरंगाबाद ) ; 'तुझ्या रूपाचं चांदणं ' यासारख्या अनेक भन्नाट गीतांची रचना करणारे सुप्रसिद्ध गीतकार,विनोदाचे बादशहा, ख्वाडा फेम डॉ.विनायक पवार (रायगड), गोड गळा व दर्जेदार कवितांची निर्मिती करणाऱ्या कवयित्री अलका तालणकर (अमरावती) ;सुप्रसिद्ध गीतकार व चित्रकार त्याचबरोबर कसदार निर्मिती आणि दमदार अभिव्यक्ती असलेले कवी विष्णू थोरे (चांदवड) हे निमंत्रित कवी सहभागी होणार आहेत. शिवाय 19 जानेवारी 2023रोजी महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या विविध कलागुणांचा आविष्कार संपन्न होणार आहे.त्याचबरोबर या चार दिवसात विविध कार्यक्रमाची रेलचेल महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होईल.

संस्थेचे ज्येष्ठ संचालक, मा. अनिलरावजी देशमुख ; सचिव,मा. रवींद्रजी देशमुख ; कोषाध्यक्ष ,मा प्रा. प्रसादजी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक प्राचार्य,डॉ. एल. एस. मुंडे; स्मृतिसमारोहाचे समन्वयक तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड ,प्रा.कल्याणकर आर. बी. ,प्रा.के. बी. देशपांडे ,प्रा. डॉ.अरुण चव्हाण,प्रा.विशाल पौळ यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी  केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !