युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:ऋषिकेश आघाव यांची राजपत्रित अधिकारी म्हणून नियुक्ती

 ऋषिकेश आघाव यांची राजपत्रित अधिकारी म्हणून नियुक्ती



परळी प्रतिनिधी परळी तालुक्यातील मोजे सारडगाव येथील भूमिपुत्र ऋषिकेश उद्धवराव आघाव यांची न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा गृह विभाग महाराष्ट्र शासन येथे *वैज्ञानिक अधिकारी  (राजपत्रित अधिकारी - गट ब)* पदी नियुक्ती झाली आहे. या नियुक्ती बद्दल ऋषिकेश आघाव यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


परळी तालुक्यातील मौजे सारडगाव येथील पनगेश्वर  शुगर मिलचे माजी प्रशासकीय अधिकारी उद्धवराव आघाव यांचे चिरंजीव ऋषिकेश आघाव हे मुंबई येथे महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन  (एम पी एस सी )परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत दिनांक 26 डिसेंबर 2022 रोजी त्यांची न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा गृह विभाग महाराष्ट्र शासन वैज्ञानिक अधिकारी (राजपत्रित अधिकारी - गट ब) पदी नियुक्ती झाली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या