परळी तालुक्यातील परचुंडीचा सर्वेश बनला इंडियन एअर फोर्स मध्ये फ्लाईंग ऑफिसर
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
तालुक्यातील परचुंडी येथील मूळ रहिवासी असलेला सर्वेश नावंदे हा इंडियन एअर फोर्स मध्ये फ्लाईंग ऑफिसर म्हणून रुजू झाला आहे.
चि. सर्वेश सुभाष नावंदे मुळगाव परचुंडी ता परळी हा हैदराबाद येथील ट्रेनिंग संपवून इंडियन एअर फोर्स मध्ये फ्लाईंग ऑफिसर म्हणजे पायलट म्हणून 2 जानेवारी २०२३ रोजी रुजू झाला आहे . त्याच्या या यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले जात आहे.
अल्पपरिचय.....
●सर्वेश सुभाष नावंदे
स्टॅंडर्ड फर्स्ट टू ट्वेलव्ह व्हीं पी एम एस स्कूल, पुणेमॉडन कॉलेज गणेश खिंड येथे बीएससी मॅथ्स डिग्री घेतली. ते करत असतानाच त्याने पहिल्याच वर्षी एनसीसी हेडकॉटर, बालभारती समोर एस बी रोड, येथे एनसीसीसाठी ऍडमिशन घेतले.
बीएससी मॅथ्सच्या सेकंड इयरला असताना त्याची आर डी सी ( रिपब्लिक डे कॅम्प ) साठी महाराष्ट्राच्या टीममध्ये बेस्ट कॅडेट एअर विंग म्हणून निवड झाली.
त्यानंतर औरंगाबाद येथे तीन महिन्याचा प्री आर डी सी कॅम्प केला व दिल्लीमध्ये 26 जानेवारी २०१८ च्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राची टीम सहभागी झाली.
भारतातून आलेल्या सर्व राज्याच्या कॅडेट्स मधून त्याला नॅशनल लेवलला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोल्ड मेडल व batan देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच भारताचे एनसीसी चे प्रमुख यांचे हस्ते बेस्ट कॅडेट ट्रॉफी ही देण्यात आली.
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालया मार्फत युथ एक्सचेंज प्रोग्रॅम अंतर्गत भारताची टीम रशिया येथील संरक्षण दलामध्ये सहभागी होण्यासाठी गेली होती.तिथे गेल्यानंतर ही सर्वेशने बेस्ट कॅडेट ची ट्रॉफी मिळवली.
त्यानंतर डिग्रीच्या शेवटच्या वर्षात तो एनसीसी C (सी) सर्टिफिकेट पास झाला.
बीएससी मॅथ्सची पदवी मिळवल्यानंतर त्याने पुणे विद्यापीठांमध्ये एक वर्षाचा डिझास्टर मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला आहे.हे करत असताना त्याने एअर फोर्स एपटीट्यूड टेस्ट आणि सीडीएस या यूपीएससी कडून घेण्यात येणाऱ्या परिक्षेत त्याने यश संपादन केले.
तसेच एनसीसीचे सी सर्टिफिकेट पास झाल्याने त्याला डायरेक्ट एस एस बी ( सर्विस सिलेक्शन बोर्ड ) मध्ये संधी मिळाली या पाच दिवसाच्या इंटरव्यू मध्येही त्याने यश संपादन केले.या परीक्षांमध्ये यश मिळवून त्याची इंडियन एअर फोर्स अकॅडमी दुंडीगल हैदराबाद येथे फ्लाईट कॅडेट म्हणून निवड झाली.
त्याची 17 डिसेंबरला पासिंग आऊट परेड हैदराबादी येथील इंडियन एअर फोर्स अकॅडमी मध्ये पार पडली.
त्यानंतर त्याची इंडियन एअर फोर्सचा फ्लाईंग ऑफिसर म्हणून 2 जानेवारी 23 रोजी नियुक्ती नियुक्ती झाली. वडील सुभाष नावंदे हे सेवानिवृत्त क्रीडाधिकारी आहेत तर आई सौ कविता नावंदे(निंबाळकर ) या सध्या औरंगाबाद येथे जिल्हा क्रीडाधिकारी पदावर कार्यरत आहेत. सर्वेश चे मूळ गाव परचुंडी ता परळी जि बीड हे आहे.सर्वेश प्रेस फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे , परचुंडीच्या सरपंच सौ मीना गुरुलिंग नावंदे व आदर्श शिक्षक अशोक नावंदे यांचा पुतण्या आहे. त्याच्या या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Very Nice👍👍👍
उत्तर द्याहटवा