MB NEWS:जेष्ठनेते रामकृष्ण लाहोटी यांचे निधन

 जेष्ठनेते रामकृष्ण लाहोटी यांचे निधन




परळी प्रतिनिधी 

परळी शहरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष रामकृष्णजी लाहोटी यांचे दि.20 रोजी सायंकाळी 7 वाजता वृध्दपकाळाने निधन झाले आहे.मृत्यू समयी 72 वर्षाचे होते. त्यांचा अंत्यविधी 21 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.


 रामकृष्णजी लाहोटी बीड जिल्हयात काँग्रेसी नेता म्हणुन त्यांची ओळख निर्माण केली. काँग्रेस विचार जिल्हयात तळागाळात रुजविण्यसाठी त्यांनी अतिषय मेहनत घेतली आहे.विविध व्यापारी असोशिएनाच्या माध्यमातून व्यापाऱ्याच्या प्रश्नाची सोडवणुक करण्यासाठी अतिषय मेहनत घेतली असुन ते परळी व्यापारी असोशिएशनेचे अध्यक्षपदही त्यांनी बराच काळ भुषविले होते.विविध परळीच्या नागरी प्रश्नावरही त्यांनी प्रशासनाला धारेवर धरुन प्रश्नाची सोडवणुक केली आहे.त्यांचे कार्य सामाजिक,राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय राहिले आहे.अश्या नेत्याच शुक्रवार दि.20 जानेवारी रोजी राञी 7 वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाल्याने सर्व स्तरातुन शोकभावना येत आहेत.

स्व. नंदलालजी लाहोटी यांचे जेष्ठ चिरंजीव होते. तर निशा साडी सेंटरचे प्रोपरायटर  महेश लाहोटी यांचे  ते वडिल होते.

स्वर्गिय रामकृष्ण लाहोटी यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,तीन भाऊ,पाच बहिणी,सुना नातवंडे असा भरगच्च परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !