इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:मनाला विभोर करणाऱ्या व कलेचा सुगंध पसरविणाऱ्या कलाविष्काराने रसिक झाले 'मनविभोर'

 मनाला विभोर करणाऱ्या व कलेचा सुगंध पसरविणाऱ्या कलाविष्काराने रसिक झाले 'मनविभोर'




दि. १९ .०१ .२०२३ 

      परळी ( प्रतिनिधी)

कैःलक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात रंगलेले 'मनविभोर' या शीर्षकाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व नारळ वाढवून  या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्‌घाटन  संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, सचिव मा. रवींद्र देशमुख , प्राचार्य डाॅ. एल.एस. मुंडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डाॅ.आर.के. यल्लावाड , प्रा.डॉ. विनोद जगतकर , सांस्कृतिक विभागातील , प्रा. राजश्री कल्याणकर, प्रा.क्षितिजा देशपांडे , प्रा .डॉ .अरुण चव्हाण , प्रा.विशाल पौळ यांची यावेळी उपस्थिती होती. 'गणाध्यक्षाय धीमहि ' या

गणपती नृत्य गीताने गणेश वंदना करून *मनविभोर सुगंध कलेचा* या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रारंभ झाला . त्यानंतर सादर झालेल्या

 'सत्यम् शिवम् सुंदरम् 'या गाण्यावरील अप्रतिम नृत्याविष्काराने सर्वांनाच मोहिनी घातली .वृषाली साक्षी, शिवानी यांनी  'फू बाई फू या 'गाण्यावर सादर केलेला नृत्यप्रकार दाद घेवून गेला . महाराष्ट्राची लोककला असलेला लोकनृत्यप्रकार व लावण्याचा नयनरम्य आविष्कार करणारा 'लावणी 'नृत्यप्रकार सादर केला . अंकिता वाव्हळे व समूह यांनी सादर केलेल्या 'आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी ' या लावणी नृत्याने महाराष्ट्र कलेचे दर्शन घडवले . भारतीय लोकसंस्कृतीचा उपासक असा, मोरपिसांची टोपी घातलेला 'वासूदेव'कसा गावाला धर्मजागृती देत येतो हे  देविका बदाले या विद्यार्थिनीने आपल्या वासुदेव नृत्यात 'गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी ' या गीताने दाखवून दिले .

आरती आणि समूहाने 'देश रंगीला 'या देशभक्तीपर गीतावर अप्रतिम नृत्य सादर केले . कावेरी डोळेने कथ्थक हा उत्तर प्रदेशचा नृत्यप्रकार उत्कृष्ट रीतीने सादर करून प्रेक्षकांची दाद घेतली . साक्षी , सायली ,वृषाली , दिव्या व अश्विनी यांनी उत्तम असे युगल नृत्य सादर केले .विनोदी नाटक 'सख्खी बायको मेली ' या नाटकाने सर्व श्रोत्यांना हसवून सोडले . स्त्रियावर होणार्‍या अत्याचाराचे दर्शन   तृप्ती तंवर , संध्या , ऐश्वर्या व संध्या यांनी सादर केलेला 'मूकाभिनयातून ' उत्कृष्ट रीतिने घडवले. 'चंद्रमुखी 'लावणी हा कलाप्रकार  देविका व गायत्री यांनी सादर केला . ही भन्नाट लावणी पाहताना श्रोतृवृंद दंग होऊन गेले .नेहा,आरती , गीतांजली यांनी 'ए वतन ' हे देशभक्तीपर गीत सादर केले . किरण किरवले आणि समूह यांनी केलेले भीमगीतावरील नृत्य हे श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले . त्यानंतर  प्रियंका होके हिने 'ढोलकीच्या तालावर ' या गाण्यावर अप्रतिम नृत्य सादर केले .  गायत्री , स्नेहल व समूह यांनी सादर केलेला कोळीगीत हा कोकणी नृत्यप्रकार श्रोत्यांना आनंद देऊन गेला . कावेरी डोळे . देविका बदाले  हिने 'वाजले की बारा ' ही अप्रतिम लावणी सादर केली . मुकाबला साँग - वृषाली आणि समूह . - तृप्ती तंवर हिने केलेल्या 'घुमर' या गीतावरील नृत्याने प्रेक्षकांना ताल धरावयास भाग पाडले . तिचा नृत्याविष्कार डोळ्याचे पारणे फेडणारा होता . 

छत्रपति शिवचरित्रावरील गायत्री दीक्षित आणि समूह यांनी केलेला पाळणा नृत्याविष्कार राष्ट्राभिमान जागृत करणारा होता . त्यांच्या हर हर महादेव या शिवगर्जनेने आसमंत दुमदुमून गेला . या कला आविष्कारास प्रा.विशाल पौळ यांनी रु.१०००चा पुरस्कार जाहीर केला . 'मेरे डोलना ' या गीतावर केलेले कावेरी डोळे हिच्या कलात्मक पदलालित्याने उपस्थितांची मने जिंकली . देविका बदाले आणि समूह यांचा महाराष्ट्राची कुलदेवता जगदंबा तुळजाभवानीच्या भक्तीचा आविष्कार करणाऱ्या 'गोंधळ' या लोक कलाप्रकाराचे अप्रतिम सादरीकरण झाले . सरतेशेवटी 'नागिन डान्स' या नृत्यप्रकाराने या रंगारंग कार्यक्रमाची सांगता झाली .

  या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा.डॉ.यल्लावाड व विद्यार्थिनी समूहातील तनुजा देशमुख , सावंत निकिता , समृद्धी सांगळे, पठाण सानिया यांनी  केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख डाॅ.यल्लावाड यांनी महाविद्यालय स्टाफ व उपस्थित परळीकरांचेआभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!