परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:पौळ पिंप्री येथे जिजाऊंचे भव्य स्मारक उभारणार !- लक्ष्मण पौळ

 महिलांचा सन्मान करणे हीच जिजाऊंना खरी आदरांजली- डॉ.शालीनी कराड



 पौळ पिंप्री येथे जिजाऊंचे भव्य स्मारक उभारणार !- लक्ष्मण  पौळ

सिरसाळा (प्रतिनिधी) प्रत्येकानं आपल्या घरातील,तसेच समाजातील महिलांचा सन्मान करने हिच खरी राजमाता जिजाऊना आदरांजली ठरेल असे प्रतिपादन डॉ. शालिनीताई कराड यांनी पौळ पिंपरी येथे जिजाउ जयंती निमित्त बोलताना केले. 

   मागील तीन वर्षांपासून जिजाउ जयंती निमित्त ' सन्मान जिजाऊंच्या लेकींचा ' या उपक्रमांतर्गत कर्तुत्ववान महिलांचा व विद्यार्थिनींचा  सन्मान केला जातो. ही संकल्पना राबवणारे जिजाऊ प्रतिष्ठानचे मुख्य मार्गदर्शक  राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ हे आपल्या मनोगतात बोलताना  म्हणाले की, सिंदखेड  राजा येथील मातृतिर्थापासून प्रेरणा घेऊन पौळ पिंपरी येथे जिजाऊंचे स्मारक उभारले आहे .येणाऱ्या काळात हे आणखी भव्य  केले जाईल व 'सन्मान जिजाऊंचा लेकिंचा' या उपक्रमाची व्याप्ती आणखी वाढवली जाईल.  तसेच येणाऱ्या काळात जिजाऊची जयंती हा पिंपरी ग्रामस्थांचा ग्रामोत्सव होईल असे म्हणाले.

  कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी जिजाउ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. उज्वालाताई लक्ष्मण पौळ तर प्रमुख पाहुण्या डॉ. शालिनीताई कराड,डॉ. प्रणिता तोर कल्पनाताई आघाव मा. सरपंच शामलताई पौळ ,पंडित मॅडम, निशा शिंदे या होत्या.

यावेळी गावातील एम.बी. बी एस, बी.ए.एम एस, बी डी एस, नेट सेट, पी एच डी, पि. जी.करणाऱ्या मुलींचा व त्यांच्या पालकांचा गौरव करण्यात आला.

डॉ. शालिनी कराड यांनी स्त्रीभ्रूणहत्या,हुंडा, स्त्री -पुरुष समानता अशा ज्वलंत विषयावर मार्गदर्शन केले व मुली मुलांपेक्षा कुठल्याही क्षेत्रात कमी नसून पालकांनी आपल्या मुलींना उच्च शिक्षण द्यावे त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात जाण्यासाठी त्यांना पाठबळ द्यावे असे सांगितले. 

 यावेळी सकाळ पासूनच दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा आले होते . गावातून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती. मिरवणुकीत जिजाउ ,शिवराय यांच्या वेशभूषा केलेले जि प.शाळेचे विद्यार्थी, तसेच विद्यार्थ्यांचे लेझीम पथक लक्ष वेधून घेत होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच माणिकराव पौळ उपसरपंच गणेश आबा पौळ जिजाऊ प्रतिष्ठानचे मार्गदर्शक बबनराव पौळ  मा.पं.स.सदस्य वसंत राठोड बाळासाहेब राठोड, मधुकर पौळ, वैजनाथ जाधव ,राजेभाऊ कोल्हे, मधुकर चव्हाण, बाळासाहेब  तुपसमुद्रे व जि प शाळेतील शिक्षक वृदानी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमा दासुद मॅडम, जिजाऊ वंदना वर्षा काळे मॅडम, तर आभार दीपक गायकवाड यांनी मानले.

                 _ Video_



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!