MB NEWS:प्रभू श्रीरामांच्या देशात व छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात मायबापांचा संभाळ करा हे सांगणे हे मोठे दुर्दैव.. अविनाश भारतींचे प्रतिपादन

 प्रभू श्रीरामांच्या देशात व छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात मायबापांचा संभाळ करा हे सांगणे हे मोठे दुर्दैव.. अविनाश भारतींचे प्रतिपादन

 




परळी वैजनाथ दि.१७ (प्रतिनिधी)

     प्रभू श्रीरामांच्या देशात व छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात मायबापांचा संभाळ करा हे सांगणे हे मोठे दुर्दैव आहे असे परखड विचार लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष स्व . श्यामरावजी देशमुख ( काका ) यांच्या स्मृतिसमारोहाच्या सायंकालीन सत्रात मा . श्री अविनाश भारती यांनी प्रतिपादन केले . 

      लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात सोमवारी (दि.१६) संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.श्यामरावजी देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मृतिसमारोहाचे भव्य उद्घाटन संपन्न झाले. सायंकालीन सत्राच्या व्याख्यानात  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष , मा.संजयजी देशमुख हे होते तर प्रमुख उपस्थितांमध्ये संस्थेचे सचिव मा. रवींद्रजी देशमुख , कोषाध्यक्ष प्रा. प्रसादजी देशमुख तसेच  संचालिका सौ . छायाताई देशमुख , सौ .विद्याताई देशमुख , श्री मंगेश देशमुख , हेमंत कुलकर्णी यांची उपस्थिती होती .  

 या अत्यंत भारावलेल्या कार्यक्रमात 

 ऐसी कळवळ्याची जाती I करी लाभावीण प्रीती ॥ या श्री तुकाराम महाराजांच्या वचनाची आठवण प्रकर्षाने होत होती .

याप्रसंगी ... महाविद्यालयाला दि .ज. दंडे यांच्या नावाने . भव्य व्यासपीठ बांधून देणारे मा . श्री .डॉ . विवेकजी दंडे , श्री वैद्यनाथ नागरी पतसंस्थेच्या वतीने व्हेंडिंगमशीन व व्हील चेअर दिलेले प्रा .श्री अरूण अर्धापुरे तसेच  महाविद्यालयाला कै .शंकरराव पेंटेवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ  वाटर फिल्टर देणारे श्री बाळूशेठ पेंटेवार यांचा हृद्य सत्कार संपन्न झाला .

   कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कोषाध्यक्ष मा. प्रा .श्री प्रसादजी देशमुख यांनी केले . ते म्हणाले , 'विदुषी राष्ट्रोत्कर्षं करोति' हे ब्रीद घेऊन काकांनी या महाविद्यालयाची स्थापना केली .त्यांत त्यांना स्व . गोपीनाथजी मुंडे यांचे पाठबळ लाभले . काळ प्रतिकूल असताना केवळ स्त्री शिक्षणाचा उदात्त हेतू घेऊन काकांनी महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली.' इत्यादी विचार त्यांनी मांडले. पुढे ते म्हणाले की महाविद्यालयाच्या उभारणीत स्व . काकांसोबतच मा .अनिलरावजी देशमुख यांचेही मोठे योगदान आहे .विद्यापीठीय पातळीवर महाविद्यालयाच्या ११ विद्यार्थिनींनी पटकाविलेले सुवर्णपदक , रासेयोचा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून प्राचार्य एल .एस. मुंडे सरांना मिळालेला  पुरस्कार . ९० % स्टाफचे विद्यावाचस्पती पदवी संपादन करणे  अशा अनेक महाविद्यालयाच्या वैशिष्टयांचे त्यांनी  प्रतिपादन केले . समाजऋण लक्षात घेऊन हा स्मृतिसमारोह प्रारंभ केला . अशी भूमिका सांगून त्यांनी महाविद्यालय यशाचा यथार्थ आढावा घेतला .


     *नाचू कीर्तनाचे रंगी I ज्ञानदीप लावू जगी I .* अशा संत नामदेव ज्ञानदेवादी वारकरी संत मांदियाळी सह माँ जिजाऊ , आई - वडिलांचे ऋण फेडणारे - छत्रपति शिवाजी - संभाजी, सावित्रीबाई फुले , संत गाडगेबाबा यांना वंदन करून पहिल्या दिवसाच्या  व्याख्यान सत्राला श्री अविनाश भारती यांनी प्रारंभ केला . 

              वामनदादा कर्डक यांच्या काळ्या धरणीवरले काळे , काळाने विनलेले गाळे ....तुफानातले दिवे आम्ही ....  या कवितेप्रमाणें स्व . काकांचे जीवन होते असे ते म्हणाले . प्रत्येकाच्या जीवनात आईबाप हेच दैवत आहे .सकळ *तीर्थाचिये धुरे I जिये का मातापितरे ...* ॥ ज्ञानेश्वरी

 *भरतखंडी जन्मप्राप्ती | हे तो भाग्याची संपत्ती ॥.* असे सांगून  भारतीय संस्कृती ही *मातृदेवो भव* या तत्वावर स्थिर आहे असे ते म्हणाले . जहाँ डालडाल पर ....

वो भारत देश हमारा .... 

सारे जहांसे अच्छा , ....

ये देश हे वीर जवानों का . ये दुनिया दुल्हन ... हम जियेंगे और मेरेंगे .....

दिल दिया है जान भी देंगे ..... अशी अनेक देशभक्तीपर गीते आपल्या बहारदार आवाजात सादर करून त्यांनी श्रोत्यांची मने जिंकली .

मायबापाला देव म्हणणारी व मानणारी फक्त भारतीय संस्कृतीच आहे . बाळाचे बोबडे बोल ऐकून प्रसन्न होणारे आईबाबा भारतातच आहेत .

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही  श्रींची इच्छा याचा अर्थ श्रीं म्हणजे मातुःश्रींची इच्छा . आईची इच्छा ( माँ जिजाऊ यांची ) व बापाच्या अपमानाचा बदला . यासाठी  हे स्वराज्य स्थापन केले . आई बाप यांच्या सेवेचे महत्व सांगतांना

पुंडलिकासाठी .... मायबाप सेवेमुळे विठ्ठल पंढरीत आला . आजचे पुंडलीक AC मध्ये राहतात . व मायबाप झोपडीत . आईबापांच्या उपकाराची परतफेड त्यांचा सांभाळ करून करा . मायबापाला आनंदाने जगवा . हाच खरा परमार्थ . मी कीर्तनकार बापामुळे झालो .. ज्याला आईबापांचा संघर्ष कळला तो मोठा होतो . बापामध्ये आईमध्ये देव पहा . त्यांच्या कष्टाचे ,उपकाराची जाणीव ठेवा .. जब जब दुनिया में आये .... आई माझी मायेचा सागर .... या कवितांचे गायन करून  शिकून जे पोरगं मायबापाला सांभाळत नसेल तर त्याच्या.. जीवनात कांहीही अर्थ नाही ..... Take Education . we can chang world... अशा अनेक मौल्यवान विचारांची पेरणी त्यांनी आपल्या खुमासदार शैलीतून केली .

लगीन झाल्यावर मायबाप सोडून पोरगं येगळं ऱ्हायलं ... अशी स्थिती बदला असे सांगून

त्यांनी माझ्या करता काय केलं असं म्हणण्याऐवजी मी त्यांच्यासाठी काय करू शकतो हा विचार करा . छोट्या गोष्टीतून तत्वज्ञान शिकवतात ते आईवडील . आईबापाची सेवा करा हीच खरी भक्ती . तुझ्या शहरी गरजा मधून . चार दोन साठवीत जा .... अर्धी भाकरी पाठवीत जा ..... घरची माय व गोठ्यांतील गाय यांची काळजी घ्या . आता 

अंगाई संपली . पाळणाघरं आली . 

मायबापाला सांभाळा त्यात सुख बघा ...... अशा अनेक कविता आपत्या भारदस्त आवाजात गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले . .

. याच कार्यक्रमात स्व . काकांच्या स्मृती समारोहा निमित्त घेण्यात आलेल्या आंतरशालेय व आंतरमहाविद्यालयीन रांगोळी व मेहेंदी स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला . त्यांत मेहंदी स्पर्धेत शालेय गटात कु . श्रेया इंगळे फाऊंडेशन शाळा , प्रतिक्षा उफाडे कृष्णाबाई विद्यालय व रोहिणी चपटे शारदाबाई मेनकुदळे विद्यालय या विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला . तसेच वरिष्ठ विभागातून आशा साबणे महिला, रफीया कुरेशी व वैद्यनाथ कॉलेजची दिशा बांगड या विद्यार्थिनी अनुक्रमे प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला . यांना अनुक्रमे १०००रू , ७०० रु व ५००रू . , प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले . तसेच रांगोळी स्पर्धेत शालेय विभागातून अनुजा कामले शारदाबाई मेनकुदळे विद्यालय , ऋतुजा फड विद्यावर्थिनी शाळा व रोहिणी चपटे शारदाबाई मेनकुदळे व वरिष्ठ विभागातून गायत्री दीक्षित महिला कॉलेज , प्राची राजमाने  व वैद्यनाथ महाविद्यालयाची अश्विनी गुट्टे यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला यांना अनु . रु १००१ , ७०१ आणि रू ५०१ , प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले .. तसेच महिला महाविद्यालयांतर्गत संविधान ज्ञान स्पर्धेत कनिष्ठ विभागात कुंभार ऋतुजा , वाघमारे सुहानी तर वरिष्ठ विभागातून कु . कडबाने वैष्णवी व मुळे दीपाली यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्र . मिळविला त्यांना रोख रक्कम ५००रू व ३०० रू व प्रमाणपत्र स्मृति चिन्ह देऊन गौरविले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे मराठी विभाग प्रमुख प्रा .डॉ .यल्लवाड व इतिहास विभाग प्रमुख प्रा .डॉ विनोद जगतकर यांनी केले .तर आभार प्रा . प्रवीण फुटके यांनी मानले .या स्मृती समारोहाच्या सायंकालीन व्याख्यान सत्रास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी . सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि  महाविद्यालयावर प्रेम करणारे परळी आणि परळी परिसरातील अनेक नामवंत विचारवंत श्रोते व अनेक महानुभावांची उपस्थिती लाभली .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !