MB NEWS:मराठवाड्यासाठी रेल्वेचे स्वतंत्र झोन स्थापन करा-चंदुलाल बियाणी

 मराठवाड्यासाठी रेल्वेचे स्वतंत्र झोन स्थापन करा-चंदुलाल बियाणी



परळी/ प्रतिनिधी-

मराठवाडा विभागात अनेक ठिकाणी रेल्वे कार्यरत असल्या तरी या सर्व रेल्वेवर मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागाचे वर्चस्व असून मराठवाड्यातील अनेक प्रश्नांना सोडविण्याऐवजी ते प्रश्न जशास तसे पडलेले आहेत. या पार्श्वभुमीवर मराठवाड्यासाठी स्वतंत्र रेल्वे झोन अथवा प्राधिकरण मंजुर करुन या प्रदेशाचा विकासाचा अनुशेष भरुन काढावा अशी मागणी परळी रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा निमंत्रक चंदुलाल बियाणी व सचिव जी.एस. सौंदळे यांनी केली आहे. 

रेल्वेमंत्री ना. अश्विनी वैष्णव यांना परळी रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने एका निवेदनाद्वारे अतिशय मागासलेल्या मराठवाडा विभागातील रेल्वे विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी स्वतंत्र रेल्वे झोन मंजुर करण्याची मागणी समोर ठेवली आहे. मराठवाडा प्रदेश स्वातंत्र्यापुर्वी हैदराबादच्या निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता. भाषावार प्रांत रचनेनंतर हा भाग महाराष्ट्रात बिनशर्त सामील झाला होता. परंतु स्वातंत्र्यानंतरची 75 वर्ष उलटूनही लातूररोड ते लातूर या 33 किमी लांबीच्या रेल्वे मार्गाशिवाय एक मिटर लांबीचा देखील नविन रेल्वेमार्ग मराठवाड्यास मिळालेला नाही. रेल्वे मार्गाचे जाळे नसल्याने चांगले उद्योग, व्यवसाय येथे येत नाहीत याकडे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी लक्ष वेधून मराठवाडा विभाग दुष्टचक्रात अडकला असून स्वतंत्र मराठवाडा रेल्वे झोन स्थापन करणे हाच त्यावर पर्याय असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. बहुतांश भाग हा नांदेड रेल्वे डिव्हीजन अंतर्गत येत असला तरी दक्षिण मध्य रेल्वे झोन येथील मुख्यालयातील अधिकारी, मराठवाडा प्रदेशातील जनतेला स्थापत्य वागणूक देत आहे.  परिणामी मराठवाड्याचा विकास थांबला असून मराठवाड्यात नविन रेल्वे मार्ग  द्यावेत तसेच मराठवाड्यासाठी कोकण रेल्वे प्रमाणे स्वतंत्र रेल्वे झोन स्थापन करावे, असे या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, सदर निवेदन रेल्वेमंत्र्यांना देण्यात आले असून मराठवाड्यातील सर्व संसद सदस्य यांच्या माध्यमातूनही आम्ही याचा पाठपुरावा करीत असल्याचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी व निमंत्रक जी.एस. सौंदळे यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार