MB NEWS:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी, दाऊदचा उल्लेख

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी, दाऊदचा उल्लेख





केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी  देण्यात आली आहे. नितीन गडकरी यांच्या कार्यालयात  तब्बल तीन वेळा धमकीचा फोन आला. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ऑरेंज सिटी रुग्णालय जवळच्या जनसंपर्क कार्यालयात हे धमकीचे फोन आले. नितीन गडकरी यांना जीवे मारू अशा आशयाचे हे धमकीचे कॉल होते. मिळालेल्या माहितीनुसार धमकी देणाऱ्याने दाऊद  असा शब्द उच्चारत आम्हाला खंडणी  दिली नाही तर गडकरींना जीवे मारू अशी धमकी दिली. 



सकाळी 11:29 वाजता, 11:35 वाजता आणि 12:32 वाजता असे तीन वेळेला हे धमकीचे कॉल आले. सध्या पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात पोहोचले आहेत, आणि चौकशी केली जात आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरातच आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे तीन फोन आल्यानंतर वर्धा मार्गावरील त्यांचं निवासस्थान असलेल्या enrico hights बाहेरही पोलीस सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तपास यंत्रणांचे अधिकारीही तिथे दाखल झाले आहेत. 


धमकीच्या फोननंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे, त्याचे दिवसभरातील कार्यक्रम असून त्या अनुषंगाने काळजी घेतली जात आहे. फोन कुठून आला याची माहिती पोलिसांकडून घेतली जात असून बीएसएनएलकडून माहिती मागवण्यात आली आहे. सायबर क्राईम तपास करत आहे, फोन लँडलाईन वरून होता की कशावर याची माहिती नंतर पुढे काही बोलता येईल अशी माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार