MB NEWS:वायभटवाडीच्या दक्षिणमुखी मारुतीकडे घातले मुंडेंच्या सुरक्षेसाठी साकडे

 धनंजय मुंडेंच्या दीर्घायूसाठी बजरंगबलीला महाभिषेक



वायभटवाडीच्या दक्षिणमुखी मारुतीकडे घातले मुंडेंच्या सुरक्षेसाठी साकडे


प्रतिनिधी


लोकनेता सुरक्षित आणि सिद्ध व्हावा यासाठी समान्य जनता व समर्थक आपली सद्भावना आपल्या श्रद्धेचा ठायी व्यक्त करत असते. दक्षिणमुखी हनुमान तीर्थक्षेत्र वायभटवाडी हे बीड शहर नजीक असलेले जागृत देवस्थान; येथे माजी मंत्री आ धनंजय मुंडे यांच्या दीर्घायू साठी महाभिषेक घालण्यात आला.


काही दिवसा पूर्वी झालेल्या अपघातातून सुखरूप असलेले लोकनेते धनंजय मुंडे यांना सुरक्षित ठेवावे यासाठी गावकरी जनतेने व मुंडे समर्थकांनी मिळून मारुती कडे साकडे घातले.

    

आपल नेतृत्व निरामयी व सुरक्षित असावे हे त्या नेत्याच्या माती व माणसाला नेहमीच वाटते; यासाठी ते आपल्या श्रद्धा अर्पित करत असतात. लोकनेते धनंजय मुंडे यांच्या आरोग्यासाठी बीड तालुक्यातील युवकांनी वायभटवाडी येथे बजरंगबलीला महाअभिषेक घातला. यात समाधान तावरे, संतोष सिंघन, कृष्णा सिंघन, पिनु साळुंके, नारायण निर्धार, हनुमान  साळुंके, बबन तावरे, पोलीस पाटील दत्ता शिंघन, कृष्णा निर्धार, सुरेश वायबट, सुरज वायभट, रोहित तावरे, ऋतुराज वायभट यांच्या नेतृत्वात गावकरी व भाविकांनी महाभिषेक केला. हभप पुरोहित मुकुंद भोगे यांनी महाभिषेक मंत्रोच्चारात संपन्न केला.

                       Video 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार