MB NEWS:राष्ट्रीयस्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धेत चंद्रशेखर फुटके यांची निवड

राष्ट्रीयस्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धेत चंद्रशेखर फुटके यांची निवड 



सर फाऊंडेशन महाराष्ट्र आयोजित, राष्ट्रीयस्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा 2022 मध्ये महाराष्ट्रातून निवडल्या गेलेल्या शिक्षकांमध्ये परळी वैजनाथ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी (केंद्र मिरवट) येथील शिक्षक श्री चंद्रशेखर शिवलिंगअप्पा फुटके यांचा विजेत्यांमध्ये समावेश आहे. त्यांच्यासह बीड जिल्ह्यातील तीन शिक्षकांचा समावेश आहे.


सर फौंडेशन महाराष्ट्र ही संस्था शिक्षकांसाठी प्रतिवर्षी विविध उपक्रमांचे आणि स्पर्धांचे आयोजन करत असते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी शिक्षक नवेनवे प्रयोग करत असतात, अशा प्रकारचे प्रयोग देश पातळीवर एकत्रित यावेत आणि अशा प्रयोगांचे सार्वत्रिकीकरण व्हावे यासाठी सर फाऊंडेशन महाराष्ट्र आयोजित, राष्ट्रीयस्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा 2022 चे आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांसह अधिकारी पातळीवर सुद्दा याचा समावेश होता. 


परळी वैजनाथ तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जाणारे श्री चंद्रशेखर फुटके यांनी २०१४ पासून आजतगायत सुरु ठेवलेल्या विद्यार्थी वाचनालयाचा उपक्रम या स्पर्धेसाठी पाठवला होता. उपक्रमातील नाविन्यता पाहून सर फाऊंडेशन महाराष्ट्रने याची निवड केली असून लवकरच होणाऱ्या सोहळ्यात श्री फुटके यांचा गौरव करण्यात येणार आहे. 


जिल्हा परिषद शाळा टोकवाडी, वडगाव दादाहारी व कासारवाडी येथे हा उपक्रम राबवण्यात आला.  विद्यार्थ्यांच्या हाती वाचनालय देऊन त्यामार्फत वाचन विकासासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यात आली आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार