MB NEWS:अंबाजोगाई, केज तालुक्यातील सुमारे साडेदहा हजार हेक्टर क्षेत्रास मिळणार पाणी

 मांजरा धरणाच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करून सिंचनासाठी तातडीने पाणी सोडा - धनंजय मुंडेंचे पाटबंधारे विभागास पत्र




धानोरा (बु.) येथील लोखंडी पुलाच्या दुरुस्तीचेही काम पूर्ण करावे, मुंडेंची मागणी

परळी (दि. 5) - बीड व लातूर जिल्ह्याची जलवाहिनी असलेले मांजरा धरण याही वर्षी पूर्ण क्षमतेने भरले असून, या धरणाच्या कालव्यांच्या देखभाल व दुरुस्तीची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण केली जावीत व त्याद्वारे शेती सिंचनासाठी नियमित पाणी सोडले जावे, अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी एका पत्राद्वारे पाटबंधारे विभागाकडे केली आहे. 


या धरणातून जाणाऱ्या डाव्या कालव्याच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई व केज या दोन तालुक्यातील आवाड शिरपुरा, नायगाव, सौंदना, इस्थळ, आपेगाव, धानोरा (बु.) कोपरा-अंजनपूर, देवळा, पाटोदा, ममदापुर, अकोला, मुडेगाव, सुगाव, तडोळा आदी गावांतील सुमारे 10 हजार 558 हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली येते. हा संपूर्ण भाग अत्यंत सुपीक असून या पाण्याच्या भरोशावर या भागातील शेतकरी ऊस व तत्सम रब्बी हंगामातील पिके घेतात.


रब्बी हंगामामध्ये डिसेंबर महिन्यातच मांजरा धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी सोडणे अपेक्षित असून अद्याप या कालव्याची देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण न झाल्याने तसेच कालवा सल्लागार समितीची बैठक वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांना अद्याप डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले असल्याचे धनंजय मुंडे आपल्या पत्रात म्हणतात. 


या भागातील पिके पाण्याअभावी सुकू लागले असल्याचेही अनेक शेतकऱ्यांनी कळवले असून ऊसाला देखील दोन आठवड्यांच्या आत पाणी न मिळाल्यास उसाचे पीक धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.


मांजरा धरणाच्या डाव्या कालव्याच्या क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांची मागणी व नैसर्गिक गरज लक्षात घेत सदर कालव्याच्या देखभाल दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण केली जावीत, धानोरा बुद्रुक येथील लोखंडी पुलाचे दुरुस्तीचे काम पूर्ण केले जावे व डाव्या कालव्याद्वारे नियमित सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार त्यांच्या कार्यालयाकडून पाटबंधारे लातूर विभागाचे अधीक्षक अभियंता व संबंधित कार्यकारी अभियंता याना देण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !