MB NEWS:जे.पी.नड्डा यांचा कार्यकाळ वाढला, २०२४ पर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष

 जे.पी.नड्डा यांचा कार्यकाळ वाढला, २०२४ पर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष


 


भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा २०२४ पर्यंत वाढवण्यात आला आहे. दिल्ली येथील भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीनंतर नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत अमित शहा यांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे. आगामी सर्व निवडणुका या नड्डा यांच्या नेतृत्वात होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


पुढे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याविषयी बोलताना अमित शहा म्हणाले, मी पक्षाच्या वतीने नड्डा यांचे वचनबद्ध नेतृत्व आणि योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो. महामारीच्या काळात, आमच्या पक्षाने नड्डा यांच्या नेतृत्वाखाली बरीच महत्त्वपूर्ण कामे केली आहेत; मग ते गरिबांना अन्न आणि रेशन पुरवण्याबाबत असो किंवा लोकांची तपासणी आणि उपचार पुरवणे असो, असेही ते म्हणाले.

देशातील सर्व राजकीय पक्षांपैकी केवळ भाजपच खऱ्या अर्थाने लोकशाही पुढे नेण्याचे काम करत असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !