MB NEWS:क्रिप्टोकरन्सी हा केवळ जुगार, पूर्णपणे बंदी घालावीच लागेल : आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास

 क्रिप्टोकरन्सी हा केवळ जुगार, पूर्णपणे बंदी घालावीच लागेल : आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास



मुंबई: क्रिप्टोकरन्सीबाबत आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास  यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. क्रिप्टोकरन्सी हा केवळ जुगार असून त्यावर देशात पूर्णपणे बंदी घातली पाहिजे, असे दास यांनी म्हटले आहे. मुंबईतील बिझनेस टुडे बँकिंग आणि इकॉनॉमी समिटमध्ये  त्यांनी क्रिप्टोकरन्सीबाबत आऱबीआयची भूमिका स्पष्ट केली आहे. “क्रिप्टोकरन्सीला केवळ जुगार म्हणून शकतो. आरबीआयची भूमिका अगदी स्पष्ट आहे की सर्व क्रिप्टोवर बंदी घातली पाहिजे. ब्लॉकचेनच्या तंत्रज्ञानास समर्थन देणे आवश्यक आहे कारण त्यात इतर अनेक ॲप्लिकेशन्स आहेत.” असे दास यांनी नमूद केले आहे.

क्रिप्टोवर बंदी का हवी? याबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले की, क्रिप्टोकरन्सीची व्याख्या खूप अस्पष्ट आहे. “काही लोक याला मालमत्ता म्हणून संबोधतात, तर इतर काहीजण त्याचा फायनान्सियल प्रोडक्ट म्हणून उल्लेख करतात आणि तसे असल्यास त्यात काही अधोरेखित करणे आवश्यक आहे. क्रिप्टोच्या बाबतीत काहीही अधोरेखित नाही.

दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी क्रिप्टोकरन्सीच्या (cryptocurrencies) किमतीतील अस्थिरतेवरही भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले “किंमतीतील अस्थिरता ही मेक-बिलीव्ह संकल्पनेवर आधारित आहे जिथे विशिष्ट क्रिप्टोची किंमत वर किंवा खाली जाऊ शकते. म्हणून ज्याचे मूल्यमापन पूर्णपणे मेक-बिलीव्हवर अवलंबून असते त्याला केवळ जुगार म्हणून संबोधले जाऊ शकते.”
“आपल्या देशात जुगाराला परवानगी ​​नाही आणि जर क्रिप्टोकरन्सीला जुगार समजले तर त्यासाठी विशिष्ट नियम असावेत. क्रिप्टो हे फायनान्सियल प्रोडक्ट नाही. यामुळे क्रिप्टोला फायनान्सियल प्रोडक्ट अथवा मालमत्ता संबोधणे पूर्णपणे चुकीचे आहे.” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

क्रिप्टो करन्सीवर बंदी घालण्यात यावी, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याआधीही सुचवले होते. पण अशा कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी करायची झाली, तर त्याला जागतिक पाठबळ लागेल, अशी भूमिका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याआधी व्यक्त केली होती.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार