इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:पालिकांच्या निवडणुका लांबणीवरच; फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार सुनावणी

पालिकांच्या निवडणुका लांबणीवरच; फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार सुनावणी




नवी दिल्ली – मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर गेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात प्रलंबित असलेल्या याचिकांवर आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. या याचिकांवर सुनावणी होईपर्यंत “जैसे थे’ परिस्थिती कायम ठेवावी, असे आदेशही न्यायालयाने राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगास दिले आहेत.  सर्वोच्च न्यायालयाने पुढील महिन्यात निवडणुकांना हिरवा कंदील दाखविला, तर एप्रिल-मे मध्ये त्या होऊ शकतील. अन्यथा पावसाळ्यामुळे त्या आणखी लांबणीवर जाण्याची चिन्हे आहेत.


महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभागांची आणि सदस्यांची संख्या वाढविण्याचा घेतलेला निर्णय, प्रभागरचना निश्‍चित करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारकडे घेण्याचा निर्णय, प्रभाग आणि सदस्य संख्या पुन्हा पूर्ववत करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय, 92 नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षण ठेवायचे की नाही, हा मुद्दा यासह काही बाबींवर सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका प्रलंबित आहेत. अनेक गुंतागुंतीचे मुद्दे असल्याने तातडीने ज्याबाबत आदेश देणे आवश्‍यक आहे, त्यासंदर्भात अर्जदार, राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारतर्फे बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी एक मुद्‌द्‌यांबाबतचा मसुदा सादर करावा, असे निर्देश सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने गेल्या सुनावणीच्या वेळी दिले होते.




या याचिकांवर न्यायालयात 17 जानेवारीला सुनावणी ठेवण्यात आली होती. पण सरन्यायाधीश चंद्रचूड हे घटनापीठाच्या कामकाजात दिवसभर व्यस्त राहिल्याने याचिकांवर सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे या याचिकांवर लवकर सुनावणी घेण्याची विनंती अर्जदारांच्या वकिलांनी बुधवारी सरन्यायाधीशांच्या खंडपीठापुढे केली. त्यावर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी ठेवण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. याचिकांवर सुनावणी होईपर्यंत “जैसे थे’ परिस्थिती कायम ठेवावी, असे आदेशही न्यायालयाने राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगास दिले आहेत. तारीख निश्‍चित करण्यात आलेली नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!