MB NEWS:लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या विभागिय कार्यालयाचे परळीत उद्घाटन

 लोकनेते गोपीनाथराव मुंडे  ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या विभागिय कार्यालयाचे परळीत उद्घाटन



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

     लोकनेते गोपीनाथराव मुंडे  ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या विभागिय कार्यालयाचे परळीत आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे  ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक जयश्री सोनकवडे- जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .

          सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत परळी वैजनाथ येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे  ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या विभागिय कार्यालय सुरु करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महेश काॅम्प्लेक्स येथे हे कार्यालय सुरु झाले आहे. या अंतर्गत महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ उसतोड कामगार व कुटुंबांना देण्यात येणार आहे.नोंदणी करून उसतोड कामगारांना ओळखपत्राचे वाटप करणे, उसतोड कामगार पाल्यांसाठी वसतिगृह सुरु करणे, आरोग्यविषयक लाभ मिळवून देणे आदीबाबत कामकाजाला गती मिळणार आहे.


     लोकनेते गोपीनाथराव मुंडे  ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे पुणे येथे राज्यस्तरीय तर परळी येथे प्रादेशिक कार्यालय असणार आहे. महामंडळातर्फे उसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वसतिगृह आणि इतर योजना राबविण्यात येणार आहेत.महामंडळाच्या अंतर्गत संत भगवानबाबा निवासी वस्तीगृह सुरू करण्यातयेणारआहेत.ऊसतोड कामगारांना विमा संरक्षणाबरोबरच महिलांना आरोग्य सुविधा देण्याचाही प्रयत्न मंडळाकडून केला जाणार आहेत. 

     लोकनेते गोपीनाथराव मुंडे  ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या विभागिय कार्यालयाचे परळीत  आज  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त तथा लोकनेते गोपीनाथराव मुंडे  ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक जयश्री सोनकवडे- जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी,कर्मचारीवृंद उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार