MB NEWS:स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे लोणारवाडी येथे सात दिवशीय शिबिर उत्साहात

 स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे लोणारवाडी येथे सात दिवशीय शिबिर उत्साहात 



 परळी वैजनाथ.....

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय परळी वैजनाथ येथील लोणारवाडी येथे सात दिवशीय सेवा योजनाचे शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. वनमालाजी गुंडरे मॅडम प्रमुख पाहुणे बीड जिल्हा समन्वयक(राष्ट्रीय सेवा योजना) प्रा. डॉ. अमोल गंगणे ह. भ. प. बाबा महाराज मुंडे डाबीकर श्री अजयजी सोळंके, सरपंच संघमित्रा मुंडे उपसरपंच वैजनाथ गीते रावसाहेब गीते (माजी चेअरमन) प्राध्यापक राजू कोकलगावे इत्यादी उपस्थित होते.

याप्रसंगी ह. भ. प. बाबा महाराज मुंडे यांनी बेटी बचाव बेटी पढाव आपल्या कीर्तनातून सामाजिक विषय घेऊन शिक्षणातून मुलींची प्रगती होते मुलीं दोन घरांचे उद्धार  करते असे त्यांच्या कीर्तनातून स्पष्ट केले.

डॉ. अमोल गंगणे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व विषद करून त्यांनी मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय समारोप करताना डॉ. वनमालाजी गुंडरे मॅडम यांनी राष्ट्रीय सेवा योजनांचा उद्देश स्पष्ट केला.

या शिवाय कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये डॉ. एल. आर. मुंडे प्रा. लव्हाळे  प्रा. आघाव  प्रा. संकेत हंडीबाग , प्रा. राठोड , प्रा. सरफराज शेख  , प्रा. कोठुळे, प्रा. गिरीश चाटे  प्रा.देशमुख मॅडम, प्रा. बनसोडे मॅडम प्रा.इतापे  प्रा. स्वामी , प्रा. मुंडे प्रा. अमर देशमुख  प्रा. ढेपे  व अमोल सरवदे, दत्ता सौंदळे, लता मिसाळ व विद्यार्थी स्वयंसेवक आणि विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राघव गव्हाणे व प्रस्ताविक प्रा.डॉ. श्रीहरी गुट्टे  व आभारप्रदर्शन प्रा. भगवान  कदम सर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !