परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर, काळजी करण्याचे कारण नाही

 धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर, काळजी करण्याचे कारण नाही




विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार, खासदार सुनील तटकरे, अनिकेत तटकरे यांनी ब्रीच कॅन्डी मध्ये भेटून केली तब्येतीची विचारपूस


खा.शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा.सुप्रियाताई सुळे, जयंत पाटील यांनीही केली फोनवरून चौकशी


धनंजय मुंडेंच्या उत्तम आरोग्यासाठी राज्यभरातून शुभेच्छा व्यक्त, रस्ते अपघातात झाले होते जखमी


मुंबई (दि. 4) - माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या अपघातानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्या छातीमध्ये किरकोळ मार असून ते सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यांच्या तब्येतीबाबत कोणत्याही प्रकारचे काळजीचे कारण नसल्याचे कळविण्यात आले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते खासदार सुनील तटकरे, आ. अनिकेत तटकरे हे ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेऊन आस्थावाईक पणे चौकशी करत पुढील उपचाराबाबत रुग्णालय प्रशासनास सूचना करत धनंजय मुंडे यांना लवकर बरे होण्याबाबत सदिच्छा व्यक्त केल्या. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सौ सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह राज्यातील अनेक मान्यवर नेत्यांनी धनंजय मुंडे यांची फोनवरून चौकशी केली असून त्यांना लवकर आराम मिळावा याबाबत आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला काल मध्यरात्रीनंतर मतदारसंघातील दौरा आटपून परळी कडे जात असताना अपघात झाला व या अपघातात ते किरकोळ जखमी झाले होते; परंतु धनंजय मुंडे यांच्या अपघाताची वार्ता सबंध राज्यात वाऱ्यासारखी पसरली व सबंध राज्यभरातून धनंजय मुंडे यांच्या शुभचिंतकांकडून काळजी व्यक्त करत त्यांना लवकर आराम मिळावा व त्यांनी पुन्हा एकदा पूर्ववत जनसेवेत दाखल व्हावे याबद्दल त्यांच्या बाबत सदिच्छा व्यक्त करण्यात येत असून अनेक हितचिंतक हे प्रार्थना करत आहेत.


दरम्यान धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून ते सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात पुढील उपचार घेत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!