MB NEWS: वीज वितरणाच्या विरोधात तीव्र संताप

 वीजवितरणकडून सातत्याने गणेशपार विभागावर अन्याय; एकतर दोन दिवसाआड पाणी सुटते त्याचवेळी लाईट नसते - अश्विन मोगरकर 




परळी वैजनाथ

परळी शहरातील फक्त गणेशपार भागातच रोज सकाळी लाईट जात आहे, आधीच शहरात दोन दिवसाआड पाणी येत आहे त्यात सकाळी लाईट नसल्यामुळे महिला वर्गाची तारांबळ उडते आहे. हा आमच्या गणेशपार भागावरचा अन्याय आहे. ही अन्यायकारक लोडशेडिंग त्वरित बंद करण्यात यावी अन्यथा महावितरण समोर आंदोलन करण्याचा इशारा भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी दिला आहे.

परळी शहरातील फक्त गणेशपार भागातच महावितरण तर्फे लोडशेडिंग केली जात आहे. विजबिलांची पठाणी वसुली करत असलेले महावितरण थोडेसे बिल बाकी असेल तर वीज पुरवठा खंडित करते आहे. परंतु प्रामाणिकपणे वीज बिल भरणाऱ्या बहुसंख्य ग्राहकांना काही विजचोरांमुळे महावितरण अन्यायकारक लोडशेडिंगची शिक्षा देत आहे. शहरात गणेशपार भागातच वीज चोरी होते काय? इतर भागातही वीजचोरी आहेच परंतु लोडशेडिंग फक्त गणेशपार भागातच होत आहे. वीजचोरी थांबवणे हे महावितरण अधिकाऱ्यांचे कामच आहे, त्याची पगार त्यांना मिळते परंतु चोर सोडून संन्याशाला फाशी असा प्रकार परळीचे महावितरणचे अधिकारी करत आहेत. 

परळी शहरात दोन दिवसाआड पाणी येते आणि पाणी आल्यास सकाळी लाईट नसते. सकाळी शाळेत जाणारी मुले, नौकरदार, व्यापारी यांना थंडीचे गार पाण्याने आंघोळ करावी लागत आहे. अती थंडीमुळे आधीच लहान मुले व वृद्ध माणसे आजारी पडत आहेत.  MSEB मुळे विनाकारण त्रास होत आहे. 

ही फक्त गणेशपार भागातील अन्यायकारक लोडशेडिंग त्वरित बंद करण्यात यावी अन्यथा गणेशपार भागातील नागरिकांना घेऊन आंदोलनाचे पाऊल उचलावे लागेल असा इशारा भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी दिला आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !