परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
वीजेच्या लपंडावाला नागरिक वैतागले; दिवा बत्तीलाच व्यापार्यांच्या दुकानातील वीज गायब-सतिश जगताप
*परळी/प्रतिनिधी*
परळी शहर परिसरात विशेषतः बाजारपेठेत वीज जाण्याच्या प्रकारात चांगलीच वाढ झाली असून महावितरणला सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर उत्तर का मिळत नाही असा सवाल शिवसेनेचे जेष्ठ नेते सतिश जगताप यांनी केला आहे.मागील काही दिवसापासून बाजारपेठेतील वीज जाण्याच्या प्रकारात चांगलीच वाढ झाली असून या अंधाराचा फायदा घेवून काही अनुचीत प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे जगताप म्हणाले.
परळी शहरातील वीजेचा लपंडाव हा आता नित्याचाच एक भाग झाला असून लहान मोठया कारणामुळे वीज जाते काय आणि तासाभराने येते काय या मागचे कारण महावितरणला अद्यापही कळू शकलेले नाही. मागील काही दिवसात तर दररोजच बाजारपेठ भरलेली असताना लाईट जाते आणि व्यापारी मात्र अंधारातच आपले व्यवहार करतात. दुसरीकडे मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकु कार्यक्रमासाठी बाहेर पडलेल्या महिलांना रस्त्यावरील अंधारातूनच ये जा करावी लागत आहे, अशा परिस्थितीला परळीचे महावितरणच जबाबदार असून येत्या तीन दिवसात वीज पुरवठा सुरळीत न केल्यास महावितरणच्या विरोधात आंदोलन करूत असा इशारा शिवसेनेचे जेष्ठ नेते सतिश जगताप यांनी दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा