परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:संतती सद्गुणी नसेल तर निसंतान असलेलं बरं :-रामायणाचार्य ह.भ.प.ढोक महाराज

 लेक माझा अभिमान: ढोक महाराजांच्या किर्तनाचे आयोजन करुन केला मुलीचा वाढदिवस


 


संतती सद्गुणी नसेल तर निसंतान असलेलं बरं :-रामायणाचार्य ह.भ.प.ढोक महाराज


डॉ.पांडुरंग चाटे यांच्याकडून  कन्येचा जन्मोत्सव अनोख्या पध्दतीने साजरा

परळी वैद्यनाथ दि.१८(प्रतिनिधी) स्त्रीभृण हत्येचा कलंक लागलेल्या परळी वैद्यनाथ तालुक्यातील मांडवा(परळी) गावचे सुपूत्र डॉ.पांडुरंग चाटे यांनी मात्र आपल्या कन्येचा जन्म दिवस अनोख्या पध्दतीने साजरा करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. दरम्यान त्यांनी रामायणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांचे हरी किर्तन आणि  नगर भोजन आयोजीत करून कन्या चिरंजिवी श्रीजा हिचा प्रथम जन्मोत्सव साजरा केला. 

समाजात एकीकडे मुलगी नको म्हणून तीची गर्भातच जन्माला येण्यापूर्वीच हत्या केली जाते. त्यातही स्त्रीभृण हत्येचा कलंक लागलेल्या परळीत सकारात्मक बाब घडली आहे. तालुक्यातील मांडवा गावचे सुपूत्र डॉ. पांडुरंग बळीराम चाटे यांनी मात्र समाजापुढे आपल्या कृतीतून नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी आपली कन्या चिरंजिवी श्रीजा हिचा प्रथम वाढदिवस सोमवार दि. १६ जानेवारी रोजी अनोख्या पध्दतीने साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने नगर भोजन आणि रामायणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांचे हरी किर्तन आयोजीत केले होते. त्यांनी संत जनाबाई यांच्या 

ऐसा पुत्र देंई संतां ।

तरी त्या आवडी पंढरिनाथा ॥१॥

गीता नित्य नेमें ।

वाची ज्ञानेश्वरी प्रेमें ॥२॥

संतांच्या चरणा ।

करी मस्तक ठेंगणा ॥३॥

कन्या व्हावी भागीरथी ।

तुझे प्रेम जिचे चित्तीं ॥४॥

ऐसे करी संतजना ।

दासी जनीच्या निधाना ॥५॥या अंभगांचे निरुपण करतांना महाराजांनी सांगीतले की आपल्या पोटी भगवान विठ्ठलावर निस्सीम श्रद्धा, नित्याने गीता, भागवत, ज्ञानेश्वरी यांचे वाचन करणारा संत जन्माला यावा. मुलगी असेल तर ती भागीरथी सारखी पवित्र असावी. संतती सद्गुणी नसेल तर निसंतान असलेलं बरं असे त्यांनी सांगितले. 

या कार्यक्रमाला परळी वैद्यनाथ पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!