MB NEWS:पोलीस ठाण्याअंतर्गत सरकारी वाहन वापर: चौकशीची मागणी

पोलीस ठाण्याअंतर्गत सरकारी वाहन वापर: चौकशीची मागणी




परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
        परळीतील तीन पोलीस ठाण्यात सरकारी मोटारसायकल व वाहनांचा वापर कोणत्या कारणांसाठी केला? याबाबत पेट्रोलिंग वाहनांचे आवक जावक नोंद, रजिस्टर नोंद, आदींची तपासणी करून  चौकशी करण्याची मागणी होत आहे.
 
       पोलीस स्टेशन च्या सर्व मोटरसायकल  सकाळी वा संध्याकाळी पोलीस स्टेशन मध्ये  हजेरीवर लावाव्यात, मोटरसायकल कर्तव्यावर जाताना  ठाणे अमलादर यांचे कडील रजिस्टरवर सह्या करून चावी पोलीस स्टेशन मधून घेऊन जाणे,काम संपल्यावर पोलीस स्टेशनला आणून लावणे, चावी पोलीस ठाणे आमलदार यांचे कडे जमा करणे. तसेच लोग बुक लिहणे,  मोटरसायकल चे रजिस्टर दैनंदिन नोंद करणे ही जबाबदारी हे वाहन वापरणाऱ्याची आहे. यात कसुरी करणाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी होत आहे.
       परळीतील शहर पोलीस ठाणे,संभाजीनगर पोलिस ठाणे व ग्रामीण पोलीस ठाणे या तीन पोलीस ठाण्या अंतर्गत वापरात असलेल्या सरकारी वाहनांच्या वापराचा गोषवारा व आवक जावक तपासणी करुन या वाहनांवरील खर्चाचा तपशील याची पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर,अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेहरकर, पंकज कुमावत यांनी  चौकशी करावी अशी मागणी होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !