MB NEWS:जागतिक आरोग्य सल्लागार डॉ. तुकाराम नेहरकर यांच्या सौजन्याने होणार पुष्पवृष्टीचे आयोजन

 संत वामनभाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त यंदा हेलीकॉप्टरने गहिनीनाथगडावर होणार पुष्पवृष्टी




जागतिक आरोग्य सल्लागार डॉ. तुकाराम नेहरकर यांच्या सौजन्याने होणार पुष्पवृष्टीचे आयोजन


पाटोदा (दि. 14) - वैराग्यमूर्ती ह भ प संत श्री वामन भाऊ यांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे प्रथमच हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी होणार आहे. 


रविवार दि. 15 जानेवारी रोजी श्री क्षेत्र गहिनीनाथगडावर ह.भ.प. संत श्री वामन भाऊ यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, घाटशीळ पारगाव येथील मूळ रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा जागतिक आरोग्य सल्लागार डॉ. तुकाराम नेहरकर व सौ. रेखाताई तुकाराम नेहरकर यांच्या सौजन्याने समाधी मंदिरावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. 


वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने दरवर्षी लाखो भाविक गडावर दर्शनासाठी येतात. यादिवशी संत वामन भाऊ यांच्या समाधी स्थळाचे विधिवत पूजन करण्यात येते, याच वेळेत नेहरकर दाम्पत्याच्या वतीने ही पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !