MB NEWS:विद्यापीठ नामांतराचा लढा हा सामाजिक अस्मितेचा होता- प्राचार्य, डॉ संजय वाघमारे

 विद्यापीठ नामांतराचा लढा हा सामाजिक अस्मितेचा होता- प्राचार्य डॉ संजय वाघमारे 


    

परळी वैजनाथ...... जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, 29 वा नामविस्तार दिन साजरा करण्यात आला त्याप्रसंगी शिवजागृती महाविद्यालय नळेगाव ता.जि.लातूर येथील प्राचार्य , डॉ संजय वाघमारे यांनी विद्यापीठ नामांतराचा लढा हा सामाजिक अस्मितेचा लढा होता असे उद्गार काढले.या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.डी व्ही मेश्राम, प्रमुख व्याख्याते प्राचार्य डॉ. संजय वाघमारे, विद्यापरिषद सदस्य व लोकनेते गोपीनाथराव मुंडे संशोधन केंद्राचे सदस्य,डॉ.पी एल कराड, उपप्राचार्य प्रा.हरीश मुंडे, आय क्यू ए सीचे समन्वयक डॉ. बी व्ही केंद्रे, पर्यवेक्षिका प्रा. मंगला पेकमवार, समन्वयक प्रा. उत्तम कांदे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ.बी.के शेप यांनी नामांतर चळवळीची पार्श्वभूमी सांगून प्रमुख वक्त्याचा परिचय करून दिला. प्रमुख व्याख्याते डॉ.संजय वाघमारे यांनी नामांतर आंदोलन हे 1978 ते इ.स. 1994 या दरम्यान महाराष्ट्रात घडलेले दलित चळवळीचे आंदोलन होते. औरंगाबाद येथील 'मराठवाडा विद्यापीठा'ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे  मागणी' या आंदोलनाची होती. शेवटी 17 वर्षाच्या संघर्षानंतर या विद्यापीठाचे नाव बदलून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असे नामांतर नव्हे तर नामविस्तार करण्यात आला.बाबासाहेबांच्या नावासाठी दलित बांधवांनी अनेक अन्याय - अत्याचार, जुलूम सहन केले. गावोगावी, शहरात आणि खेड्यापाड्यापर्यंत नामांतराच्या आंदोलनाची ठिणगी पडलेली होती. जिकडे-तिकडे एकाच नारा गुंजत होता “नामांतर झालेच पाहिजे”'.  सरकार नामांतर करत नाही म्हणून बाबासाहेबांच्या नावासाठी अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले असे सांगितले .कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी व्ही मेश्राम यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाची सामाजिक चळवळ म्हणून या नामांतर चळवळीकडे पाहिले जाते असे सांगून या विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देणे कसे योग्य होते हे पटवून सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ. अर्चना चव्हाण तर आभार डॉ. रामेश्वर चाटे यांनी मांडले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !