MB NEWS: ■ आपघात: बसची धडक ;दुचाकीस्वार ठार

 ■ आपघात: बसची धडक ;दुचाकीस्वार ठार



केज ..

भरधाव शिवशाही बसने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना केज – अंबाजोगाई रस्त्यावरील कृषी विज्ञान केंद्राजवळ शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी बस चालकासह बस ताब्यात घेतली असून तरुणाच्या मृतदेहाचे शनिवारी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. 

            लातूर एसटी बस आगारातील चालक दत्तात्रय केरबा सांगळे हे शिवशाही बस ( एम. एच. ०६ बी. डब्ल्यू. ०८८७ ) औरंगाबादहून लातूरकडे घेऊन निघाले होते. केजहून ही बस लातूरकडे जात असताना शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास केज – अंबाजोगाई रस्त्यावरील कृषी विज्ञान केंद्राजवळील उमराई फाट्यावर धम्मपाल बबन साखरे ( वय २९, रा. लोखंडी सावरगाव ता. अंबाजोगाई ) हा दुचाकीवरून ( एम. एच. ४४ ए. ९५२७ ) बसला ओव्हरटेक करून पुढे गेला. याचवेळी भरधाव शिवशाही बसने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या धम्मपाल बबन साखरे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

    दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार रमेश सिरसाट, जमादार बाळासाहेब घोरपडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठविण्यात आला असून शनिवारी नातेवाईक आल्यानंतर शवविच्छेदन केले जाणार आहे. तर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी बस ताब्यात घेतली असून पुढील कारवाई सुरु आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार