MB NEWS: तलावात आढळले तरुणाचे प्रेत

  तलावात आढळले तरुणाचे प्रेत



बीड: बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत लिंबारुई देवी येथील  तलावात मृत अवस्थेत तरुणाचे प्रेत आढळल्याने एकच खळबळ उडाली पिंपळनेर पासून जवळच असलेल्या लोणी शहाजनपूर येथील तरुण बेपत्ता असल्याची कालच पिंपळनेर पोलीस स्टेशनला नोंद झाली होती आज दिनांक 20 रोजी सकाळी लिंबू येथील तलावामध्ये एक पर्यंत असल्याची माहिती पिंपळनेर पोलिसांना मिळाली पिंपळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब आघाव फौजदार महादेव ढाकणे यांच्यासह पोलीस कर्मचारी बहिरवाळ, मगर हे घटनास्थळी जाऊन ते प्रेत बाहेर काढले असता त्या प्रेताची ओळख पटली असून लोणी शहाजनपुर येथील दिनेश श्रीमंत मते वय 36 वर्ष असे तलावात आढळलेल्या तरुणाचे नाव निष्पन्न झाले आहे याप्रकरणी बीड पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांनी घटनास्थळी पाहणी करून त्या मृत अवस्थेत आढळलेल्या तरुणाला बीड येथील शासकीय रुग्णालया कडे रवाना केले आहे याप्रकरणी मागील दोन दिवसांमध्ये लोणी शहाजानपुर फाट्यावर भांडण झाल्याची चर्चा प्रथमदर्शनी कडून सांगण्यात येत आहे तरी याप्रकरणी पुढील तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !