MB NEWS:परळी तालुक्याचे भूमिपुत्र रमाकांत फड यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती

 परळी तालुक्याचे भूमिपुत्र रमाकांत फड यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती




परळी वैजनाथ (प्रतिनिधी)...


      बर्दापूर पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले परळी तालुक्यातील दौंडवाडी चे सुपुत्र रमाकांत वामनराव फड यांची पोलीस उपनिरीक्षपदी पदोन्नती झाली आहे. पोलीस खात्यांतर्गत बीड जिल्हा पोलीस दलामध्ये रमाकांत फड यांना प्रदिर्घ सेवेच्या आधारावर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरून पोलीस उपनिरीक्षक या पदावरती पदोन्नती देण्यात आली आहे. या यशाबद्दल बीड जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


     परळी तालुक्याचे भूमिपुत्र असणारे रमाकांत फड हे गेल्या 34 वर्षापासून राज्याच्या पोलीस दलामध्ये अखंडीत रित्या प्रमाणिकपणाने सेवा बजावत आहेत. 1988 साली ते जालना या ठिकाणी पोलीस सेवेमध्ये रुजू झाले. तदनंतर त्यांनी बीड, युसुफ वडगाव, धारूर, अंबाजोगाई, परळी इत्यादी पोलीस ठाण्यांतर्गत आपली कर्तव्यदक्ष सेवा बजावली. सध्या ते बीड जिल्हा पोलीस दलामध्ये बर्दापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. परळी तालुक्यातील मूळचे दौंडवाडी चे रहिवासी असणारे श्री. रमाकांत वामनराव फड यांनी अतिशय कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, तथा  शिस्तप्रिय अधिकारी म्हणून पोलीस दलामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पोलिसात व सामान्य नागरिकात नेहमी सुसंवाद असावा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच समाजातील सर्व घटकांनी कायद्याचे कठोर पालन करावे यासाठी ते नेहमीच आग्रही असतात. सेवा जेष्ठतेच्या आधारानुसार पोलीस दलातील जे कर्तव्यदक्ष कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र असतात अशा कर्मचारी व अधिकाऱ्यांना पोलीस दलाच्या वतीने पदोन्नती देण्यात येते याच अंतर्गत रमाकांत फड यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरून नियमित पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. या यशाबद्दल बीड जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून रमाकांत फड यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार