MB NEWS:वैद्यनाथ कॉलेजमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन वक्तृत्व स्पर्धा घेऊन साजरा

 वैद्यनाथ कॉलेजमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन वक्तृत्व स्पर्धा घेऊन साजरा




परळी प्रतिनिधी -वैद्यनाथ कॉलेजमधील विशाखा समितीच्या वतीने अल्पसंख्यांक हक्क दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.  त्यात वकृत्व स्पर्धा घेऊन ॲड.शुभांगी गीते श्री प्रकाश सिंग तुसाम यांच्या उपस्थितीत पोस्टर प्रेसेंटेशन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी व्हि मेश्राम यांनी भूषवले .याप्रसंगी ॲड. शुभांगी गीते, प्रा तुसाम ,प्राध्यापक पेकंमवार, विशाखा समिती प्रमुख डॉ. अर्चना चव्हाण व प्रा.समीर रेणुकादास यांची उपस्थिती होती, मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ,कु. बोडवाले  सोमय्या ,इमानदार फरदीन, सय्यद मोहनीश फातेमा, सय्यद नेहा फातेमा, आदनान शेख ,समीर शेख, रयत रोडे अभिजीत रोडे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पोस्टर प्रकाशनामधून अल्पसंख्यांकाची भाषा व संस्कृती विचार यांची मांडणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या वकृत्व अल्पसंख्यांकाचे प्रश्न व परिवर्तनाचा प्रभाव असे मुद्दे विषय नमूद करण्यात आले निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची विशेष उपस्थिती होती .विशाखा समितीने अल्पसंख्याक वर्गातील मुलींना त्यांच्या हक्क आणि कर्तव्याची जाणीव याविषयीची माहिती व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .कार्यक्रमाची प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.अर्चना चव्हाण यांनी केले तर आभार प्रा.समीर रेणुकादास मानले. या कार्यक्रमासाठी डॉ.आर्या ,प्रा. मस्के ,प्रा. मनोज वाघमारे, डॉ. एम.जी लांडगे यांनी विशेष सहकार्य केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !