MB NEWS:जिजाऊ व विवेकानंद जयंतीनिमित्त वैद्यनाथ महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा

 जिजाऊ व विवेकानंद जयंतीनिमित्त वैद्यनाथ महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा 



   परळी वैजनाथ,दि.१२- 

                राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त येथील वैद्यनाथ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.व्ही. मेश्राम यांच्या हस्ते पार पडले. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य एच.डी. मुंडे, पर्यवेक्षिका एम. एन. पेकमवार, स्पर्धेचे परीक्षक प्रा.डा. अर्चना चव्हाण, प्रा. डॉ. आर. जे. चाटे, प्रा. दिलीप गायकवाड तसेच संयोजक प्रा.डा. एन. एम. आचार्य आदी मान्यवर उपस्थित होते. 


              प्रारंभी प्राचार्य डॉ.मेश्राम व मान्यवरांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन केले व नंतर दीप प्रज्वलनाने स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी प्राचार्य डॉ.डी.व्ही.मेश्राम यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला.  ते म्हणाले- राष्ट्रमाता जिजाऊंनी प्रतिकूल परिस्थितीत देखील  कठोर परिश्रम, अपूर्व त्याग व पुरुषार्थाने बाल शिवबांना मानवतेचे संस्कार देऊन त्यांना जुलमी अन्याय व अत्याचारांविरुद्ध आवाज उठवण्यास प्रवृत्त केले, तर स्वामी विवेकानंदांनी जागतिक पातळीवर भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. या दोन्ही महापुरुषांचे आदर्श जीवन युगानुयुगे दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणादायी ठरणारे आहे.                    


        यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेत जवळपास दहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत अनुक्रमे मनोज मुंडे (प्रथम),कु.चैताली दहिफळे (द्वितीय),कु. शुभम् हांडे(तृतीय), तर राहुल औटी,कु. सुप्रिया रोडे, कु. पल्लवी औटी (उत्त्तेजनार्थ) यांनी पारितोषिके प्राप्त केली. याप्रसंगी पर्यवेक्षिका प्रा. पेकमवार, डॉ. आर. जे.चाटे, प्रा. दिलीप गायकवाड , डॉ. आचार्य, डॉ. चव्हाण  यांनीही विचार मांडले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार