MB NEWS:स॔त तुकाराम महाराज बीजेनिमित्त 14 गावं एकत्र :शेतकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन

 संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त 14 गावं एकत्र:शेतकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन 

परळी / प्रतिनिधी 


जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त 14 गावांनी एकत्र येऊन भव्य शेतकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला असून त्याच्या तयारीची बैठक कान्नापूर ता. धारुर येथे संपन्न झाली. तुकाराम महाराज यांच्या जीवनाच्या  विविध पैलूंवरचे दर्शन यावेळी होणा-या कीर्तन आणि व्याख्यानातून होईल, अशी माहिती समन्वयक ॲड.अजय बुरांडे यांनी दिली.


तुकाराम महाराज यांच्या बीजेचे औचित्य साधून 3 मार्च ते 9 मार्च दरम्यान कन्नापूर परिसरातील 14 गावांच्या वारकरी, शेतकरी, कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन या सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात विजय महाराज गवळी, मधुकर महाराज बारुळकर, नाना महाराज कदम, जलाल महाराज सय्यद, ज्ञानेश्वर महाराज वाबळे, ज्ञानेश्वर महाराज बंडगर, शामसुंदर महाराज सोन्नर यांची कीर्तने होणार आहेत. तर सचिन पवार, रामेश्वर त्रिमुखे, श्री संत कैकाडी महाराज यांचे वंशज भारत महाराज जाधव, डाॅ. बालाजी जाधव, श्रीकृष्ण महाराज उबाळे, विकास महाराज लवांडे यांची व्याख्याने होणार आहेत. तसेच तुकाराम महाराजांच्या गाथेचे संगीत भजन होणार आहे. 


कन्नापूर बस स्थानकाच्या परिसरात होणा-या या कीर्तन महोत्सव पर्वणीचा  परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीतील सर्व गावातील सदस्यांनी केले आहे.

------------- video news ----------------


------------- video news ----------------

------------- video news ----------------

------------- video news ----------------


------------- video news ----------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !