परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांचा 2 दिवसाचा संप

 बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांचा 2 दिवसाचा संप




परळी वैजनाथ ,प्रतिनिधी


महा बँकेतील सर्व कर्मचारी तसेच अधिकारी संघटनांनी एकत्रित येऊन प्रामुख्याने नोकर भरती आणि द्विपक्षीय वाटाघाटीतून कर्मचारी तसेच अधिकारी यांच्या प्रश्नांची सोडवणूक या प्रश्नावर २७ जानेवारी रोजी एक दिवसाचा संप केला आहे. 


दरम्यान कर्मचाऱ्यांच्या मागण्या व्यवस्थापन मंजूर करीत नसल्यामुळे हा संप आता चिघळला आहे. आज दि. ९ आणि १० फेब्रुवारी रोजी पुन्हा संपाची हाक दिली आहे.

डेप्युटी चीफ लेबर कमिशनर मुंबई यांनी मध्यस्थी केल्यानंतरदेखील

व्यवस्थापनाने आपले आडमुठे धोरण कायम ठेवले त्यामुळे कुढलाही तोडगा निघू शकला नाही. या उलट मधल्या काळात बँकेने चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार नाही आणि ते काम आ ऊटसोर्स केले जाईल, अशी भूमिका घेतली व पाच दशकापासून संघटना कार्यालयासाठी बँकेच्या इमारतीत ज्या जागा दिल्या होत्या त्या बळजबरीने ताब्यात घेतल्या. या शिवाय सरक र तसेच चीफ लेबर कमिशनर यानी निर्देश दिल्या नंतर देखिल ट्रेड युनियन अॅक्टमधील तरतुदींचे पालन करत संघटनेच्या निर्वाचित पदाधिकाऱ्यांशी वाटाघटीची तयारी व्यवस्थपनाने दाखविली नाही. या मुळे बँकेतील औद्योगिक संबंध व्यवस्था अधिकच चिघळत गेली आणि त्यातून ९ आणि १० फेब्रुवारी चा संप आता अटळ बनला.

या संपातील अंतर्भूत प्रश्न पुरेशी नोकर भरती याचा ग्राहक सेवेशी प्रत्यक्ष संबंध आहे हे लक्षात  ग्राहकांनी देखिल या संपाला पाठिंबा द्यावा यासाठी संघटनेतर्फे  आवाहन करण्यात आले. हा संप बँकेतील कर्मचारी अधिकारी पृथ्वीराज सोळंके,बालाजी डवरे, पूजा देशमुख,भाग्यश्री साखरे, मीना जोशी, दिपक घाडगे,विलास जोशी, शिवरत्न आघाव यांनी यशस्वी केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!