MB NEWS:12 फेब्रुवारी रोजी परळीच्या लावण्याई पब्लिक स्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

 12 फेब्रुवारी रोजी परळीच्या लावण्याई पब्लिक स्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन


परळी वैजनाथ.....

परळी वैजनाथ येथील डीएसएम प्रतिष्ठान संचलित लावण्याई स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन दिनांक 12 फेब्रुवारी रविवार रोजी दुपारी चार वाजता करण्यात आले आहे. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर स्थित व सध्या एक कोटीहून अधिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या ' ॲनालायझर ' या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक श्री सुशील कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महिला, बालकल्याण व शिक्षण विभागाच्या माजी सभापती तथा मराठी नाट्य परिषदेच्या नांदेड शाखेच्या अध्यक्षा सौ अपर्णाताई हृषिकेश नेरलकर यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाला परळी शहराचे माजी नगराध्यक्ष  बाजीराव धर्माधिकारी, डॉ.कुणाल अशोक जैन, संतोष कुलकर्णी, लक्ष्मीबाई देशमुख महाविद्यालयाचे पदाधिकारी संजय देशमुख, चेतन सौंदळे,डॉ. सुवर्णाताई टिंबे, डॉ वैभव डूबे  यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या स्नेहसंमेलन कार्यक्रमांमध्ये बाळ गोपाळ सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. स्नेहसंमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा मधील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्नेहसंमेलनाला पालकांनी व परिसरातील सांस्कृतिक प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन  मुख्य  मार्गदर्शक मधुकरराव गिरवलकर,  शाळेचे अध्यक्ष  अनंत कुलकर्णी, शाळेच्या प्राचार्या अस्मिता गोरे व शाळेच्या सर्व शिक्षक वृदांनी केले आहे. स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम दुपारी चार वाजता परळी येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या डॉ डी.जे. दंडे  व्यासपीठावर संपन्न होणार आहे. स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी उपप्राचार्या  पुजा बिडवे, कविता विर्धे  मॅडम    हर्षदा  परदेशी,  संघमिञा पोटभरे,  शेख सर विशेष परिश्रम घेत आहेत

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !