MB NEWS:परळीत आनंदोत्सव साजरा

 शेवटी सत्याचाच विजय झाला-शिवाजी शिंदे, वैजनाथ माने



शिवसेना नाव व धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने परळीत आनंदोत्सव साजरा


परळी (प्रतिनिधी):-

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना व धनुष्यबाण हे चिन्ह देण्याचा जो निर्णय घेतला या निर्णयाचं स्वागतचं आहे. आणि हा लोकशाहीचा, भारतीय राज्यघटनेचा विजय आहे.

तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय आहे. हा देश भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या राज्यघटनेवर चालतो कायद्यावर चालतो. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं. आणि सत्याचा विजय होत असतो. अशा शब्दात केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत  शिवसेनेचे परळी तालुकाप्रमुख शिवाजी शिंदे व शहराध्यक्ष वैजनाथ माने यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके फोडून या निर्णयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.


केंद्रीय निवडणूक आयोगाने बाळासाहेब यांची शिवसेना या पक्षाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह देण्याचा निर्णय घेतला या निर्णयाचे स्वागत परळीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके फोडून व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहर व तालुक्यात या निर्णयाचे स्वागत करण्यात आले ठीक ठिकाणी फटाके फोडून व घोषणाबाजी करून आनंदउत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी शिंदे, शहर प्रमुख वैजनाथ माने, महिला आघाडी प्रमुख यशोदा राठोड, तालुकाप्रमुख सोमेश्वर गित्ते, उपशहर प्रमुख अॅड संजय डिघोळे, बालासाहेब खोसे, युवा सेना शहरप्रमुख गजानन कोकीळ, युवा सेनेचे शहर उपप्रमुख निखिल केंद्रे, परमेश्वर बनसोडे, सचिन सोनवणे, राम बावळे ,सय्यद निसार, शिवराज गित्ते, बाळू गायकवाड, आशुतोष शिंदे, अनिकेत माने आदींची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !