MB NEWS:संपादक राजेश साबणे यांना मातृशोक ;श्रीमती निर्मलाबाई साबणे यांचे निधन

 संपादक राजेश साबणे यांना मातृशोक ;श्रीमती निर्मलाबाई साबणे यांचे निधन   




परळी (प्रतिनिधी) -  स्नेहनगर येथील रहिवाशी श्रीमती निर्मलाबाई दत्तात्रय साबणे यांचे वृध्पकाळाने दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्या ८० वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवदेहावर  दि. १० फेब्रुवारी शुक्रवार रोजी  दुपारी 1 वाजता सार्वजनिक स्मशानभूमी परळी येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे. 


दैनिक परळी प्रहारचे संपादक राजेश साबणे यांच्या त्या मातोश्री होत्या. धार्मिक व मनमिळावू असल्याने त्या सर्वपरिचित होत्या.त्यांची अंत्ययात्रा दुपारी १ वाजता   स्नेहनगर येथील राहत्या घरातून   निघणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले , एक मुलगी सूना, नातवंडे असा परिवार आहे. दैनिक परळी प्रहारचे संपादक राजेश साबणे , संजय साबणे यांच्या त्या मातोश्री होत्या तर शिवाजी साबणे, गणेश साबणे यांच्या त्या चुलती होत्या. साबणे परिवाराच्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !