MB NEWS:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस

 वृध्द,अनाथांसोबत एक दिवस अनोखा उपक्रम राबवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस

 रुद्राभिषेक,वृध्दाश्रमात आरोग्य तपासणी, अन्नदान,गुरांना चारा वाटप करुन साजरा

परळी (प्रतिनिधी)

  अनाथांचे नाथ म्हणुन प्रसिद्ध असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दि.9 फेब्रुवारी रोजी बाळासाहेबांची शिवसेनेचे परळी विधानसभा प्रमुख धनंजय गित्ते यांच्या नेतृत्वाखाली एक दिवस वृध्द,अनाथांसोबत उपक्रम राबवत घाटनांदुर येथील गुरुदास सेवा आश्रमातील वृध्दांची आरोग्य तपासणी,मोफत औषधी वाटप,अन्नदान,गुरांना चारा वाटप करण्यात आले.

 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दि. खा.श्रीकांत शिंदे,खा.गजानन कीर्तिकर, मुख्य सचिव संजय मोरे,माजी मंत्री अर्जुन खोतकर,माजी मंत्री सुरेश नवले,जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि.9  फेब्रुवारी रोजी विविध उपक्रम राबविण्यात आले.या उपक्रमांची सुरुवात सकाळी  प्रभु वैद्यनाथास रुद्राभिषेकाने करण्यात आली.त्यानंतर सकाळी 10 वा. घाटनांदुर येथील गुरुदास सेवा वृध्दाश्रमातील वृध्दांच्या आरोग्याची तपासणी करुन मोफत औषधोपचार करण्यात आले.दुपारी 12 वा.वृध्दाश्रमातील वृध्दांना अन्नदान केल्यानंतर गुरांना चारा वाटप करण्यात आला.यावेळी आश्रमातील वृध्द,निराधारांना मुख्यमंत्री यांनी सुरु केलेल्या वृध्दांना मोफत बस प्रवास,संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ योजनासह इतर योजनांची माहिती देवुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनाथांचे नाथ म्हणुन ओळखले जातात.त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यास साजेसे असे अनाथांची सेवा करण्याचे उपक्रम आम्ही राबवल्याचे समाधान असुन यापुढेही वृध्द,निराधारांची सेवा करणार असल्याचे बाळासाहेबांची शिवसेनेचे विधानसभा प्रमुख धनंजय गित्ते यांनी सांगितले.या कार्यक्रमास  सचिन स्वामी बालासाहेब देशमुख,संजय कदम गावडे,रमेश लोखंडे ,नवनाथ सरवदे, गोविंद चिवडे, नवनाथ लोभे, वैजनाथ देशमुख नारायण फड,राजेश पुरभैये, गणेश सारस्वत,जगन्नाथ कदम रमेश पवार वैजनाथ लोखंडे पांडुरंग पाणखडे राजेश लोणीकर, हरी लोखंडे हनुमान सरवदे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !