MB NEWS:पेंटर मस्के यांचे निधन; संगीतकार देवेंद्र परळीकर यांना पितृशोक

पेंटर मस्के यांचे निधन; संगीतकार देवेंद्र परळीकर यांना पितृशोक




परळी (प्रतिनिधी) युवा संगीतकार देवेंद्र मस्के यांना पितृशोक झाला असून त्यांचे वडील रामकिशन  मस्के यांचे निधन झाले आहे. प्रसिद्ध चित्रकार आणि जुन्या काळातील संगीतकार रामकिशन मस्के उर्फ पेंटर मस्के यांचे काल रात्री निधन झाले त्यांच्यावर आज सकाळी वैद्यनाथ मंदिराजवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पेंटर मस्के म्हणून  ते परिचित होते.          

     डॉ बाबासाहेब आंबेडकर  आणि सर्व महापुरुषांचे बोलके चित्र रेखाटणारे तसेच ज्या काळात डिजिटल पेंटिंग अथवा बॅनर नव्हते त्या काळातील उत्कृष्ट पेंटर, मराठवाड्यातील प्रसिद्ध चित्रकार गायक, साऊंड इंजिनिअर, रामकिशन मस्के यांचे  वयाच्या 73 वर्षी हदयविकाराने काल रात्री 8: 30 वाजता  परळी येथे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यावर 18.02.2023.रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.

    त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले पाच मुली सोना नातवंडे असा भरगच्च परिवार आहे स्वर मंगल प्रतिष्ठानचे निर्माते देवेंद्र मस्के परळीकर आणि धिरेंद्र मस्के परळीकर यांचे ते वडील होते त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 


राख सावाडण्याचा कार्यक्रम दिनांक 19 /02 /2023 रोजी सकाळी 7:00 वाजता होणार असल्याचे मस्के परिवाराकडून सांगण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !