परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS: श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग:महाशिवरात्री यात्रा महोत्सव

 श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग: महाशिवरात्री यात्रा महोत्सव ;देवस्थानच्या वतीने दि. १६ ते दि.२० पारंपरिक उत्सव कार्यक्रम



परळी वैजनाथ, प्रतिनिधी
         बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभु वैद्यनाथाचा महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने वैद्यनाथ देवस्थान च्या वतीने पारंपारिक पद्धतीने   उत्सव आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 16 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत वैद्यनाथ प्रभूंचे पारंपारिक उत्सव होणार आहेत

  परळी वैजनाथ  येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न होतो. यानिमित्त दर्शनार्थी सर्व भाविकांना दर्शन सुलभ व्हावे, पावित्र्य व मंदिराचे मांगल्य राखले जावे, गर्दीचे नियमन व्हावे यादृष्टिने सर्वतोपरी व्यवस्था करण्यात आली आहे. धर्म दर्शनेच्छूक भाविकांच्या पुरुष व महिला अशा दोन वेगळ्या रांगा राहतील.तसेच बाहेर जाण्याचा मार्ग वेगळा राहील. त्याचप्रमाणे प्रवेश पत्रिका (पास) ची सोय करण्यात आली आहे. प्रवेश पत्रिकेचे मूल्य रूपये १००/- असू प्रवेश पत्रिकाधारकांची स्वतंत्र रांग असणार आहे. दि.१७/०२/२०२३ शुक्रवार रात्रौ १२.०० वा. पासून ते १८/०२/२०२३ शनिवार रात्री १२.०० वाजेपर्यंत दर्शन घेता येईल.दर्शन पास ( प्रवेश पत्रिका) विक्रीची सोय वैद्यनाथ बँक शाखा: परळी वैजनाथ ने मंदिर परिसरात उभारलेल्या स्टॉलमध्ये केली आहे. शिवाय शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया (टॉवर), स्टेट बँक ऑफ इंडिया (गांधी मार्केट), आयडीबीआय बँक, महाराष्ट्र बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, दीनदयाळ बैंक, वैद्यनाथ बँकेच्या शाखेतही दर्शन पास विक्रीची व्यवस्था भाविकांच्या सोयीसाठी करण्यात आली आहे.

• महोत्सवातील विशेष कार्यक्रम :-

शनिवार, दि.१८/०२/२०२३ रोजी रात्रौ ६ ते ८ पर्यंत देवस्थान विश्वस्त कमेटीतर्फे मा. जिल्हाधिकारी, बीड यांच्या शुभहस्ते  रुद्राभिषेक करण्यात येईल. या अभिषेकानंतर भाविकांना अभिषेकास परवानगी देण्यात येईल. अभिषेकासाठी एका आवर्तनास एकास १०० /- रूपये आणि सपत्नीक १५०/- रूपये पडतील. कार्यालयातून पावती घेतल्यासच अभिषेक करता येईल. वार्षिक अभिषेक करणाऱ्यांनी देखील महाशिवरात्र अभिषेकाची वेगळी पावती घ्यावी लागेल. दर्शन पासच्या रांगेतून जाण्यासाठी १०० रुपयांचा दर्शन पास घेणे बंधनकारक आहे.

• परळी परिसरातील शिवभक्तांसाठी विशेष दर्शन व्यवस्था...

परळी वैजनाथ परिसरातील शिवभक्तांसाठी दर्शन पासच्या रांगेतून विनामूल्य दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दि.१८/०२/२०२३ शनिवार रात्रौ १०.०० वा. पासून रात्रौ १२.०० वा. पर्यंत (मंदिर बंद होईपर्यंत) पासच्या रांगेतून स्वतःचे ओळखपत्र उदा. आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड इ. दाखवूनच परळी परिसरातील शिवभक्तांना दर्शन घेता येईल.

• भक्तीगीत गायन ..

सोमवार, दि.२०/०२/२०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता 'श्री' जीं ची पालखी सवाद्य मिरवणुकीने निघेल. सायं. ६ वा. देशमुखपाराजवळ (श्री वैजनाथ मंदिर परिसर) प्रसिद्ध गायक पं. शंकर वैरागकर यांचा भक्तीगीत व अभंगवाणीचा कार्यक्रम होईल. अंबेवेस येथे रात्रौ ९ वा. शोभेची दारू उडविण्यात येईल. त्यानंतर गणेशपार, नांदूरवेस व गोपनपाळे गल्ली येथे कलावंतांची हजेरी होईल. नंतर अंबेवेस, भोई गल्ली मार्गे रात्री मिरवणुकीने पालखी मंदिरात परत येईल. याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा व पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ही विनंती. दिनांक २१/०२/२०२३ मंगळवार रोजी सकाळी १० ते १ पर्यंत मानाची बिदागी वाटपाचा कार्यक्रम होईल.
          भाविक भक्तांनी महाशिवरात्रीच्या पूर्व काळात दर्शन व देवस्थानच्या वतीने आयोजित विविध पारंपारिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे शांतता व सुव्यवस्थेत यात्रा महोत्सव यशस्वी करावा असे आवाहन वैद्यनाथ देवस्थान देवल कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार सुरेश शेजूळ, श्री वैद्यनाथ देवस्थान देवल कमिटीचे सचिव राजेश  देशमुख व सर्व विश्वस्त, श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट, , परळी वैजनाथ, जि. बीड. यांनी केले आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!