MB NEWS:तब्बल तीन दिवसाच्या शोधानंतर कॅनालमध्ये बुडालेल्या "त्या" शाळकरी मुलाचा सापडला मृतदेह

 तब्बल तीन दिवसाच्या शोधानंतर कॅनालमध्ये बुडालेल्या "त्या" शाळकरी मुलाचा  सापडला मृतदेह


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
      गेल्या तीन दिवसापासून दगडवाडी येथे कॅनल मध्ये बुडालेल्या मुलाच्या मृतदेहाचा शोध सुरू होता अखेर आज दिनांक 18 रोजी दुपारच्या सुमारास या शाळकरी मुलाचा मृतदेह सापडला आहे
        परळी तालुक्यातील दगडवाडी शिवारात असलेल्या  कॅनॉल मध्ये सध्या माजलगाव येथील उजव्या कालव्यातून सध्या पाणी सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आलेले आहे .दि.16 रोजी गणेश शिवाजी करवर वय 16 वर्षे रा. हटकरवाडी  ता. मानवत हा नववीत शिकणारा मुलगा पोहण्यासाठी कॅनॉल मध्ये गेला होता. त्याचे वडील  अनेक वर्षापासून दगडवाडी येथे सालगडी म्हणून काम करतात.  
        काही दिवसापूर्वीच  मुलगा वडिलांना भेटायला आला होता.पोहायला म्हणून गेला व कॅनॉल मध्ये बुडाला. गावकरी व  परळी येथील नगरपालिकेचे अग्निशामक विभागाचे कर्मचारी यांनी तीन दिवस शोधकार्य केले. अखेर आज दि.18 रोजी या कॅनॉल मध्ये शोधत शोधत पुढे गेल्यानंतर उखळी बु.शिवारात कॅनॉलच्या एका पुलाखाली अडकलेला मृतदेह आढळून आला.मृतदेहाची उत्तरिय तपासणी करून त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने सर्व स्तरातून शोकसंवेदना व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार