MB NEWS:सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूरचे सादरीकरण

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवकालीन मर्दानी खेळांचे थरार 



सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूरचे सादरीकरण


 परळी/प्रतिनिधी


बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, रयतेचे राजे, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ प्रणित सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती शक्तिकुंज वसाहत परळी यांच्या वतीने सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर शिवकालीन मर्दानी खेळ प्रात्यक्षिक मावळे व जिजाऊंची लेकिने शिवकालीन तलवार ढाल दानपट्टा काठी भाला इत्यादी शस्त्रांचा मर्दानी खेळ दि. 17 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता खुले रंगमंच क्लब बिल्डींग शक्तीकुंज वसाहत परळी येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने लहान मुले -मुली महिलेने मोठी गर्दी केली होती. सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर च्या या पथकात 18 जनाचा सहभाग होता यात  6 मुलींचाही सहभाग होता प्रवीण उबाळे , संदिप,राजेंद्र काटकर ,

या कार्यक्रमाच्या सुरुवातीस राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस वंदन करून सामूहिक जिजाऊ वंदना घेण्यात आली.

  कार्यक्रमास उद्घाटन परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे यांच्या हस्ते करण्यात आले , यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर चे प्रवीण उबाळे , उपमुख्य अभियंता एच के अवचार , शिवजयंती अध्यक्ष राजेंद्र बेंद्रे,अधीक्षक अभियंता आर पी रेड्डी, डी डी कोकाटे, अरविंद येळे, मदन पवार, सी ए मोराळे, सुरक्षा अधिकारी राजेंद्र पवार, कल्याण अधिकारी दिलीप वंजारी, व्यवस्थापक सुनील पवार, मोमीन, तुकाराम पाटील, वरून पोळ, एस बी उद्धार ,चैतन्य जाधव, भगवान साकसमुद्रे, भीमराव शिरसाट,स्वागताध्यक्ष अभिमन्यू भिसे ,संदीप काळे, अंकुश जाधव,यशवंत पवार आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार संदीप पाटील यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार