इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:नाशिक येथे होणाऱ्या सेवानिवृत्त एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वार्षिक अधिवेशनास उपस्थित रहावे : हेमंत कुलकर्णी

 नाशिक येथे होणाऱ्या सेवानिवृत्त एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वार्षिक अधिवेशनास उपस्थित रहावे : हेमंत कुलकर्णी




परळी वैजनाथ (प्रतिनिधी)...


     सेवानिवृत्त एस. टी.  कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनाचे आयोजन येत्या 20 फेब्रुवारी रोजी नाशिक येथे सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आले असून या वार्षिक अधिवेशनास अधिकाधिक सेवानिवृत्त एस. टी. कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे औरंगाबाद प्रादेशिक सचिव हेमंत कुलकर्णी यांनी केले आहे.


     याबाबत अधिक माहिती अशी की, एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्न तथा अडचणी संदर्भात विचारमंथन करून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नाशिक येथील  राष्ट्रसंत श्री. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज आश्रम पंचवटी या ठिकाणी येत्या 20 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय वार्षिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त एस.टी. कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष श्रीराम गालेवाड हे राहणार आहेत. या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना संघटनात्मक कामकाज, संघटनात्मक धोरण, संघटनेचा अहवाल, ईपीएस 95 पेन्शन बाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने चर्चा व माहिती तसेच सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसचा वर्षभर मोफत पास यासह विविध विषयावर सेवानिवृत्त एसटी कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस सदानंद विचारे तसेच संघटनेचे संघटक सचिव पी.एन. आंबेकर यांच्यासह मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. येत्या 20 फेब्रुवारी रोजी नाशिक येथे संपन्न होणाऱ्या सेवानिवृत्त एस टी कर्मचारी संघटनेच्या या राज्यस्तरीय तथा महत्त्वपूर्ण वार्षिक अधिवेशनास अधिकाधिक सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सेवानिवृत्त एस.टी. कर्मचारी संघटनेचे औरंगाबाद प्रदेशाचे प्रादेशिक सचिव श्री. हेमंत कुलकर्णी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!