MB NEWS:परळी तालुक्यातील दिव्यांगासाठी मोफत कृत्रिम अवयव व साहीत्य नोंदणीस प्रतिसाद

 परळी तालुक्यातील दिव्यांगासाठी मोफत कृत्रिम अवयव व साहीत्य नोंदणीस  प्रतिसाद



परळी 

सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार, नवी दिल्ली, जिल्हा समाज कल्याण कार्यालय जिल्हा परिषद बीड, यशवंतराव चव्हाण सेंटर, महात्मा गांधी सेवा संघ व जिल्हा पुनर्वसन केंद्र अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रीम अवयव, साहीत्य साधानांसाठी नोंदणी व तपासणी शिबीराचे आयोजन आज दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी उपजिल्हा रूग्णालय परळी वै. येथे करण्यात आले.

प्रारंभी शिबीराचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मा. धनंजय मुंडे आरोग्य योजनेचे अध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी उपजिल्हा रूग्णालयाचे अधिक्षक डॉ. अनिल गुट्टे, डॉ. व्यंकटेश तिडके, महात्मा गांधी सेवा संघाचे ऋषी सलगर, शेख निजाम भाई, परिचारीका मनिषा महाडकर, स्वाती जगतकर, शेख फेरोज भाई, विठ्ठल साखरे, मानव विकास मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद टाकळकर, मतीमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. के. चव्हाण, अपंग विद्यालयाचे मुख्याध्यापक आय. पी. लोढा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात उद्घाटक डॉ. संतोष मुंडे यांनी दिव्यांग बांधवांना सर्व साहीत्य मोफत उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशिल राहील असे अवर्जुन नमुद केले.

प्रमुख अतिथी अधिक्षक डॉ. अनिल गुट्टे यांनी उपजिल्हा रूग्णालयाच्या माध्यमातुन दिव्यांगांना तपासणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल व सदरील शिबीराच्या यशस्वी आयोजनासाठी प्राधान्याने सहकार्य केले जाईल असे प्रामुख्याने नमुद केले.

शिबीरात दिव्यांग बांधवांसाठी कृत्रीम अवयव मोजमाप करून व इतर साधन साहित्याची नोंदणी करण्यात आली. शिबीरात परळी तालुक्यातील दिव्यांग बांधवांना उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवुन साहीत्यासाठी नाव नोंदणी केली. परळी येथील उपजिल्हा रूग्णालयात तालुका स्तरावर दिव्यांग व्यक्तींना अवयवांचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा समाजकल्याण अधिकारी आर. एम. शिंदे, वे. सा. का. अंकुश नखाते जिल्हा दिव्यांग पुवर्नसन केंद्राचे विजय कान्हेकर, सतिश निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी शिबीर संपन्न झाले.

शिबीरात जवळपास 245 दिव्यांग बांधव उपस्थित होते. त्यात कर्णबधीर, मुकबधीर, अस्थीव्यंग व अंध या प्रवर्गातील दिव्यांग बांधव उपस्थित होते.

नाव नोंदणी केलेल्या दिव्यांगांना एलबो क्रॅचेस, व्हिल चेअर, श्रवणयंत्र, अंधासाठी काठी व चष्मा या सारख्या साधनांचा पुरवठा करण्यात येणार आहे. शिबीरात कृत्रीम अवयव मोजमाप तज्ञ ऋषी सलगर, शेख निजाम भाई यांनी संबंधित दिव्यांगांना माप घेऊन साहीत्या विषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आनंद टाकळकर, प्रास्ताविक ए. के. चव्हाण तर आभारप्रदर्शन मिलींद शिंदे यांनी केले.

शिबीर यशस्वी करण्यासाठी चंद्रशेखर बडे, व्ही. एम. पंडीत, पी. व्ही. चव्हाण, राजेंद्र कसबे, शेख आबेद, श्रीकांत जोशी, ज्ञानसागर कर्णबधीर विद्यालयाचे मिलींद शिंदे, संदीप इप्पर आदींनी परिश्रम घेतले.

------------- video news ----------------


------------- video news ----------------

------------- video news ----------------

------------- video news ----------------


------------- video news ----------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !