MB NEWS:खा. डॉ प्रितमताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध लोकोपयोगी कार्यक्रम - महादेव इटके

 खा. डॉ प्रितमताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध लोकोपयोगी कार्यक्रम - महादेव इटके

परळी वैजनाथ

बीड जिल्ह्याच्या विक्रमादित्य खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध लोकोपयोगी कार्यक्रम व मंदिर, दर्गा, बौद्ध विहारात प्रार्थना करून साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष महादेव ईटके यांनी केले आहे.

शुक्रवार दि 17 फेब्रुवारी रोजी परळी शहरात विविध लोकोपयोगी कार्यक्रम राबवून जिल्ह्याच्या लाडक्या व विक्रमादित्य खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला जाणार आहे. खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी जिल्ह्याचे अनेक वर्षाचे परळी बीड अहमदनगर रेल्वेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले व लवकरच ही रेल्वे धावणार आहे. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत परळी सह बीड  जिल्ह्यात लाखो लोकांचे स्वप्न खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मुळे पूर्ण झाले आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून हजारो रुग्णांना उपचार मिळऊन दिला आहे. केंद्र शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोचवण्यात खा. डॉ. प्रितमताई मुंडे या देशभरात अग्रभागी राहिल्या आहेत. 

भारताचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यकाळात भारतातील गोर गरीब जनतेसाठी विविध योजना तयार केल्या या सर्व योजना बीड जिल्ह्यात कार्यक्षम पद्धतीने खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी राबविल्या. महाराष्ट्राच्या लोकनेत्या, भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध राष्ट्रीय महामार्ग बीड जिल्ह्यात खेचून आणले. या सर्व महामार्गामुळे बीड जिल्हा देशाच्या नकाशावर ठळकपणे दिसत आहे.

खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दि 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.00 वाजता ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथास अभिषेक, 8.30 वाजता गरजू व्यक्तींना मायेची ऊब मिळावी म्हणून श्री वैद्यनाथ मंदिर परिसरात ब्लॅंकेट वाटप, 9.00 वाजता मलिकपूरा येथील दर्ग्यास चादर चढवणे, 9.30 वाजता भीमनगर येथील सुगंध कुटी बौद्ध विहारात बुद्ध वंदना,  10.00 वाजता उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप, 10.30 वाजता  अन्नपूर्णा मातेस आरती व महाप्रसाद होणार आहे. या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा, महिला आघाडी, प्रभारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख, विविध संस्थाचे संचालक, सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शहर उपाध्यक्ष महादेव इटके, अश्विन मोगरकर, विकास हालगे, राजकुमार कौलवार, सुशील हरंगुळे, नरेश पिंपळे, खाजा भाई थळकरी, पवन तोडकरी, जिया खान पठाण यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !