इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS: नव्या लेबर कोडमध्ये असंघटित कामगार आणि ऊसतोड मजुरांसाठी विशेष तरतूद करण्याची केली मागणी

 खा.प्रितम मुंडे यांनी ऊसतोड मजुरांसह असंघटित कामगारांच्या मागण्या केंद्र सरकारकडे मांडल्या


नव्या लेबर कोडमध्ये असंघटित कामगार आणि ऊसतोड मजुरांसाठी विशेष तरतूद करण्याची केली मागणी

दिल्ली । दि.०८ ।
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या व प्रामुख्याने ऊसतोड मजूर आणि बिडी वर्कर्सच्या विविध मागण्यांसाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केंद्रीय कामगार मंत्री भुपेंद्र यादव यांची भेट घेतली. असंघटित कामगारांच्या मागण्या यावेळी त्यांनी सादर करून देशात नव्याने लागू होणाऱ्या लेबर कोड संदर्भात चर्चा केली.नव्या लेबर कोडमध्ये ऊसतोड मजुरांसह बिडी वर्कर्स, असंघटित कामगारांसाठी विशेष तरतुदी करण्याच्या मागण्या त्यांनी भपेंद्र यादव यांच्याकडे सादर केल्या.

देशातील असंघटित कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा,ई-श्रम पोर्टलवर त्यांची नोंदणी करण्यात यावी. स्थलांतरित कामगारांच्या श्रेणीनुसार असंघटित कामगारांचा उल्लेख लेबर कोडमध्ये असावा. तसेच कामगारांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणाऱ्या आणि त्यांच्या आरोग्य व पाल्यांच्या शिक्षणाची जवाबदारी सुनिश्चित करून महिला कामगारांच्या आरोग्याचा विचार करणाऱ्या विशेष तरतूदी नव्याने तयार होणाऱ्या लेबर कोडमध्ये असाव्यात या मागण्या खा.प्रितमताई मुंडे यांनी भुपेंद्र यादव यांच्याकडे केल्या आहेत.

देशातील असंघटित कामगारांना अत्यंत कठीण आणि जिकरीची कामे करावे लागत आहेत, त्यांच्या कामाच्या पद्धतीत सुधारणा करणारा आणि महाराष्ट्रातील कामगारांचा विचार करणारा सर्वसमावेशक लेबर कोड तयार होईल अशी अपेक्षा त्यांनी केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे व्यक्त केली.या भेटीत असंघटित कामगारांच्या विविध मागण्यांवर अतिशय अभ्यासपूर्ण आणि सकारात्मक चर्चा झाली असून कामगारांच्या मागण्यांचा प्राधान्याने विचार करू व पुढील काळात मजुरांची देखील भेट घेऊ असा विश्वास भुपेंद्र यादव यांनी दिला असल्याचे खा.प्रितमताई मुंडे यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!